मुंबई, 11 मे- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटर इम्रान खान सध्या चांगलेच चर्चेत आहेत. इम्रान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. सध्या इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावत त्यांना पाक सरकारने अटक केली आहे. या प्रकरणामुळे इम्रान खान यांच्या आयुष्याबाबत विविध गोष्टींची चर्चा सुरु झाली आहे. इम्रान खान यांच्या लव्हलाईफबाबतदेखील चर्चा झालेली दिसून येत आहे. माजी क्रिकेटर असणारे इम्रान खान एक रोमँटिक व्यक्तिमत्व असल्याचं विविध रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येतं. इम्रान खान यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या खाजगी आयुष्याचीदेखील नेहमीच चर्चा झाली आहे. इम्रान खान यांचं नाव अनेक तरुणींसोबत जोडण्यात आलं आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इम्रान खान त्याकाळातील दोन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींच्या प्रेमात पडले होते. इतकंच नव्हे तर लग्नाचासुद्धा विचार ते करत होते. मात्र ही दोन्ही नाती एका कारणाने संपुष्ठात आली होती. (हे वाचा: आलिया-कतरीनापेक्षा हटके असणार लूक; साखरपुड्यामध्ये ‘या’ डिझायनरचे कपडे परिधान करणार परिणीती-राघव ) वादविवादांशी इम्रान खान यांचं फार जुनं नातं आहे. लव्ह लाईफ असो किंवा राजकारण सतत ते कोणत्या ना कोणत्या वादात अडकलेले दिसून येतात. विवाहित असतानासुद्धा इम्रान खान यांच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या होत्या. सोबत दोन बॉलिवूड अभिनेत्रींसोबत त्यांचं नाव जोडलं होतं. या अफेयर्सच्या चर्चांमुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. अनेकांना वाचून आश्चर्य वाटेल की, इम्रान खान यांचं नाव बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जीनत अमान यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या दोघांची भेट एका पार्टीमध्ये झाल्याचं सांगण्यात येतं. इतकंच नव्हे तर हे दोघे लंडनमध्ये एकमेकांना भेटत असल्याच्या चर्चाही त्याकाळात रंगल्या होत्या. असं सांगितलं जातं की, जीनत अमान आणि इम्रान खान यांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं. मात्र अभिनेत्रीला भारत सोडून जायचं नव्हतं त्यामुळे हे नातं तुटलं.
त्यांनंतर इम्रान खान यांचं नाव बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्यासोबतही जोडण्यात आलं होतं. त्या काळातील रिपोर्ट्सनुसार, इम्रान आणि रेखा एकमेकांना डेट करत होते. रेखा यांच्या आईने इम्रानसोबत लग्नाला परवानगी दिली होती असंही म्हटलं जातं. शिवाय इम्रान खान रेखा यांच्यासोबत काही दिवस मुंबईमध्ये राहिल्याचंही सांगितलं जातं. मात्र काही कारणास्तव या दोघांचं नातसुद्धा संपुष्ठात आलं होतं.