बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रियांका चोप्राची चुलत बहीण परिणीती चोप्रा सध्या आपल्या खाजगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे.
परिणीती चोप्रा आप खासदार राघव चड्ढासोबत रिलेशनशिपमध्ये असून लवकरच दोघे लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, परिणीती आणि राघव यांनी आपल्या साखरपुड्यासाठी सेलिब्रेटी डिझाईनर मनीष मल्होत्राने डिझाईन केलेले कपडे परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्ट्सनुसार, परिणीतीला फार हेवी वर्क असलेला लेहंगा पसंत नाही. त्यामुळे अगदी मोजकं नक्षीकाम केलेला लेहंगा तयार करण्यात येत आहे.