मुंबई, 26 नोव्हेंबर : माझ्यासाठी माझा फिटनेस गुरू माझा भाऊ आहे आणि दुसरे परुळेकर सर. डाॅ. लव्हेश जाधव. मी अभिनयात आहे. त्यामुळे मला फिटनेसची काळजी घ्यावी लागते. मी उत्साही म्हणून ओळखला जातो. तशा भूमिकाही मिळत गेल्या.
व्यायामाची मला लहानपणापासून आवड. मी नायगावला राहात होतो तेव्हा पीसीसी नावाची व्यायामशाळा होती. तिथे मी रोज जायचो. त्याची महिन्याची फी होती ५ रुपये. त्यात फक्त व्यायाम व्हायचा. फिटनेस नाही.
मी हुप्पा हुय्या सिनेमा केला. तेव्हा पहिल्यांदा पूर्ण उघड्या शरीरीनं सिनेमात कॅमेऱ्यासमोर आलो. तेव्हा फिजिक किती महत्त्वाचं आहे ते जाणवल. नंतर मी भैरू पैलवान की जय सिनेमा केला होता. तेव्हा मला बाॅडी बनवायची होती. ओळखीनं शैलेश परुळेकर सरांकडे गेलो आणि फिटनेसबद्दल जागरुक झालो.
मी दारू , सिगरेट घेत नाही. त्यामुळे आरोग्य चांगलंच राहातं. पण आपल्या शूटिंगच्या वेळा अवेळी असतात. फिटनेसमध्ये झोप महत्त्वाची असते. मी झोप पूर्ण करायचा नेहमी प्रयत्न करतो. जिथे संधी मिळेल तिथे झोप काढतो.
माझा दिवस सुरू होतो जेव्हा मी झोपेतून उठतो. मी रोज वर्कआऊट करू शकत नाही. अनेकदा माझी कामाची धावपळ हाच वर्कआऊट असतो. पण फिट राहण्यासाठी फक्त जिम किंवा आहार असत नाही. मानसिकदृष्ट्याही तुम्ही फिट असावं लागतं. ते मी राहण्याचा प्रयत्न करतो.
परुळेकर सरांनी मला सांगितलं, तुझ्याकडे भरपूर एनर्जी अाहे. ती चॅनलाईझ करावी लागेल. त्यांनी मला एक मेडिटेशनसाठी माळ दिली. पाच मिनिटं तुम्ही कुणाचंही नाव घ्या. पण पाच मिनिटं एकाग्रता हवी.
काॅलेजमध्ये असताना मी फुटबाॅल खेळायचो. क्राॅस कंट्रीही केलीय. मी जीएस होता. एनसीसीमध्ये होता. हा सगळा उत्साह मला कामात येतो आणि रोजच्या आयुष्यातही येतो.
आताची पिढी नुसती तुलना करतात, तसं करू नये. मला नव््या पिढीला सांगायचंय दुसऱ्याला इंप्रेस करू नका, स्वत:ला इंप्रेस करा. मग तुम्ही फिटनेसची काळजी आपोआप घ्याल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fitness funda, Mauli, Siddharth Jadhav, Simba