मुंबई 17 मे**:** मिस युनिव्हर्स (Miss Universe 2020) ही बहुप्रतिक्षित सौंदर्य स्पर्धा नुकतीच पार पडली. प्लोरिडामध्ये झालेल्या या स्पर्धेत मेक्सिकोच्या अँड्रा मेझा (Andrea Meza) हिनं बाजी मारली आहे. तिनं मिस युनिव्हर्स या प्रतिष्ठित सोनेरी मुकुटावर आपलं नाव कोरलं. परंतु ही स्पर्धा जिंकण हे काही सोपं काम नाही. जगभरातील शेकडो सौंदर्यवती या स्पर्धेत भाग घेतात. त्यामुळं निखळ सौंदर्यासोबतच चतुर मेंदू आणि प्रसंगावधान असणं देखील गरजेचं असतं. अन् याचिच प्रचिती अँड्रानं अंतिम फेरीत दिली. तिनं दिलेल्या उत्तरामुळं परिक्षक इतके खुश झाले की थेट तिला मिस युनिव्हर्स म्हणून घोषित केलं गेलं. स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्राझिलची जुलिया गामा (Julia Gama), पेरुची जॅनक मसिट (Janick Maceta), भारताची अँडलिन कॅसलिनो (Adline Castelino) आणि मेक्सिकोची अँड्रा मेझा असे एकणू चार स्पर्धक होते. यामधील प्रत्येकाला एक जनरल नॉलेजचा प्रश्न विचारण्यात आला. यामध्ये अँड्राला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरुन प्रश्न विचारण्यात आला. जर तू आपल्या देशाची पंतप्रधान झालीस तर कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी तू काय करशील? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर तिनं क्षणभर विचार केला आणि सर्वांनाच चकित करणारं उत्तर दिलं. नुशरतकडे घराचं भाडं भरण्यासाठी नव्हते पैसे; आज आहे कोट्यवधींची मालकीण
Final questions are here! The first to go is Mexico. #MISSUNIVERSE
— Miss Universe (@MissUniverse) May 17, 2021
LIVE on @FYI from @hardrockholly in #HollywoodFL pic.twitter.com/sJGneKgLYX
अँड्रा म्हणाली, “कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कुठल्याही योग्य असा मार्ग सापडलेला नाही. त्यामुळं सर्व प्रथम मी देशातील प्रत्येक नागरिकाचे प्राण कसे वाचतील याकडे लक्ष देईल. आपली आरोग्य व्यवस्था देशातील प्रत्येकाकडे पोहोचते आहे की नाही? याकडे प्रामुख्यानं लक्ष देईन. देशात लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही यासाठी काही उपाययोजना करेन. कारण लोक केवळ कोरोनामुळं नव्हे तर बेरोजगारीमुळं देखील मरत आहेत. अन् अशा गोष्टी माझ्या देशात होणार नाही याकडे मी विशेष लक्ष देईन.” तिनं दिलेलं हे उत्तर सर्व परिक्षकांना आवडलं. त्यामुळं अँड्राला यंदाची मिस युनिव्हर्स म्हणून घोषित करण्यात आलं.

)







