Home /News /entertainment /

नुशरतकडे घराचं भाडं भरण्यासाठी नव्हते पैसे; आज आहे कोट्यवधींची मालकीण

नुशरतकडे घराचं भाडं भरण्यासाठी नव्हते पैसे; आज आहे कोट्यवधींची मालकीण

याच काळात तिच्यावर असं एक आर्थिक संकट कोसळलं की ज्यामुळं तिला बॉलिवूडच्या समुद्रात मुद्दामुन उडी मारावी लागली. (Bollywood movies)

    मुंबई 17 मार्च: नुशरत भरूचा (Nushrat Bharucha) आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या बॉलिवूडमध्ये घराणेशाहीची जोरदार चर्चा आहे. मात्र या घराणेशाहीच्या वादातून मार्ग काढत तिनं हिंदी सिनेसृष्टीत स्वत:चं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज नुशरतचा वाढदिवस आहे. 36 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. आज नुशरत यशाच्या शिखरावर आहे. (Journey in Bollywood) परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल तिला कधीही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री व्हायचं नव्हतं. तिला अभिनय आवडायचा परंतु केवळ छंद म्हणून... परंतु याच काळात तिच्यावर असं एक आर्थिक संकट कोसळलं की ज्यामुळं तिला बॉलिवूडच्या समुद्रात मुद्दामुन उडी मारावी लागली. (Bollywood movies) नुशरतचा जन्म 1985 साली मुंबईतील एक मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती परंतु तिचा कल चित्रपटांऐवजी नाटकांच्या दिशेनं अधिक होता. तिनं अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षणही घेतलं. शिवाय अनेक प्रायोगिक आणि व्यवसायिक नाटकांमध्ये कामही केलं आहे. परंतु नाटकांमध्ये काम करुन चांगले पैसे मिळत नाहीत तू चित्रपटांमध्ये प्रयत्न कर असं वारंवार तिला सांगितलं जायचं. आणखी एक दरवाजा झाला बंद; मुंबई, गोवा नंतर ओडिसामध्येही शूटिंगची परवानगी रद्द 2006 साली तिच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलं होतं. तिचे वडिल निवृत्त झाले होते. अन् त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. निवृत्तीनंतर आलेल्या पैशांतून त्यांनी कर्ज फेडलं परंतु महिन्याचा खर्च चालवायचा कसा? हा एक प्रश्न निर्माण झाला होता. वडिलांची पेंशन पुरत नव्हती. अशा स्थितीत नुशरतनं एकाद्या चित्रपटात काम करुन भरपूर पैसे मिळवावे अन् आर्थिक समस्या सोडवावी असा विचार केला. त्या अनुशंगानं तिनं काही ऑडिशन देखील दिले. लहानपणापासून रंगभूमीवर सक्रिय असल्यामुळं ती एक अनुभवी अभिनेत्री होती. त्यामुळं लवकरच तिला ‘ताज महाल’ या दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. खरं तर हा चित्रपट फ्लॉप ठरला परंतु यामुळं तिला एकता कपूरच्या ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. राजकुमार राव आणि नुशरतच्या अनोख्या जुगलबंदीमुळं हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर एकामागून एक ‘प्यार का पंचनामा’, ‘डर’, ‘आकाशवाणी’, ‘ड्रीम गर्ल’, ‘जय माता दी’, ‘छलांग’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकण्याची संधी तिला मिळाली. दरम्यान ‘सोनू के टीटू की स्विटी’ या चित्रपटामुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. या चित्रपटातील तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून तिचे कुटुंबीय देखील अवाक् झाले होते. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी तिनं एखाद्या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यानंतर एकामागून एक चित्रपट करत आज ती एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Bollywood actress, Entertainment

    पुढील बातम्या