जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / काश्मीरी पंडितांबाबतचं 'ते' वक्तव्य साई पल्लवीला भोवलं;अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

काश्मीरी पंडितांबाबतचं 'ते' वक्तव्य साई पल्लवीला भोवलं;अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

काश्मीरी पंडितांबाबतचं 'ते' वक्तव्य साई पल्लवीला भोवलं;अभिनेत्रीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रीने आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करत सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 जून- साऊथ सुपरस्टार  (South Actress)  साई पल्लवीविरुद्ध (Sai Pallavi) हैद्राबादमधील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  ‘काश्मिरी पंडितांचं पलायन’ आणि ‘गौरक्षण’ बाबत अभिनेत्रीने वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या नेत्यांनी अभिनेत्रीविरोधात सुलतान बाजार पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पाहूया काय आहे नेमकं प्रकरण. साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अभिनेत्रीने आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करत सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे.यांनतर सोशल मीडियावर तिच्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

जाहिरात

साई पल्लवी नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे ओळखली जाते. ती सतत विविध विषयांवर आपलं मत व्यक्त करत असते. यामुळे अनेकवेळा ती अडचणीत सापडते. सध्या अभिनेत्री आपल्या आगामी ‘विराट पर्वम’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती विविध ठिकाणी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. दरम्यान एका माध्यमाला मुलाखत देताना अभिनेत्रीने असं काही वक्तव्य केलं की त्यामुळे ती वादात सापडली आहे. (हे वाचा: अभिनेत्री साई पल्लवीचे काश्मिरी पंडितांबाबत खळबळजनक वक्तव्य, नव्या वादाला सुरुवात **)** साई पल्लवीचं वक्तव्य- एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये साई पल्लवीने म्हटलं, ‘‘माझ्या मते हिंसा हा संवादाचा चुकीचा मार्ग आहे.माझं कुटुंब हे एक तटस्थ भूमिका घेणारं कुटुंब आहे. त्यांनी मला फक्त चांगला माणूस बनण्यास शिकवलं आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांचा हत्याकांड दाखवण्यात आलं आहे. तर हिंसा आणि धर्माचं मापदंड केलं गेलं, तर काही दिवसांपूर्वी एका गायीने भरलेला ट्र्क घेऊन जाणाऱ्या मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत त्याला जय श्री राम म्हणण्यास सांगण्यात आलं. मग या दोन्हीं घटनांमध्ये काय फरक आहे’. अभिनेत्रीच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात