जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Farmani Naaz: फरमानी नाज इतक्या महागड्या स्टुडिओत करते रेकॉर्डिंग; आलिशान घर पाहून सर्वच थक्क

Farmani Naaz: फरमानी नाज इतक्या महागड्या स्टुडिओत करते रेकॉर्डिंग; आलिशान घर पाहून सर्वच थक्क

Farmani Naaz: फरमानी नाज इतक्या महागड्या स्टुडिओत करते रेकॉर्डिंग; आलिशान घर पाहून सर्वच थक्क

अलीकडे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. सोशल मीडियाने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. फरमानी नाझ अशा लोकांपैकी एक आहे जिला सोशल मीडियाने स्टार बनवलं आहे.

  • -MIN READ Maharashtra
  • Last Updated :

मुंबई,11  सप्टेंबर-   अलीकडे सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे. सोशल मीडियाने अनेक कलाकारांना प्रसिद्धी मिळवून दिली आहे. फरमानी नाझ अशा लोकांपैकी एक आहे जिला सोशल मीडियाने स्टार बनवलं आहे. फरमानीचे लाखो चाहते आहेत. तिने आपल्या दमदार आवाजाचे लोकांना वेड लावलं आहे. पण, यापूर्वी ती आपल्या गाण्यामुळे वादातही सापडली होती. फरमानीच्या व्हिडिओंचा सोशल मीडियावर बोलबाला असतो. सोशल मीडिया स्टार फरमानी आता 1 कोटीच्या स्टुडिओमध्ये गाणी रेकॉर्ड करते आणि तिचं घरही खूप आलिशान आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तब्बल 1 कोटींमध्ये बनवण्यात आलेला हा स्टुडिओ फरमानी नाझसाठी खूप खास आहे. ती या स्टुडिओमध्ये तिची बहुतांश गाणी रेकॉर्ड करते आणि या स्टुडिओतील व्हिडिओ देखील शेअर करते. फरमानीने यूट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिच्या स्टुडिओची झलक पाहायला मिळत आहे. अतिशय साधं राहणीमान असणाऱ्या फरमानी नाझचं घरही अतिशय आलिशान आहे.सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंडव्हायरल होत आहे. फरमानीने आपल्या यूट्यूब चॅनलवर एक नवीन व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या स्टुडिओमध्ये काम कसं चालतं. याबाबत सांगितलं आहे. ती कशी रेकॉर्ड करते? याचीसुद्धा माहिती तिने दिली आहे. या व्हिडिओमध्ये फरमानीचं आलिशान घर आणि स्टुडिओ दोन्ही दिसून आले आहेत. सध्या याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

**(हे वाचा:** Vijay Varma: आलिया भट्टच्या को-स्टारवर तरुणी फिदा; पाकिस्तान-फ्रान्समधून आली लग्नाची मागणी ) व्हायरल व्हिडीओमध्ये फरमानीचं घर पाहून यूजर्सही आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हिडीओमध्ये फरमानीसोबत दिसणारी वंशिका या सोशल मीडिया स्टारच्या घरी फेरफटका मारत आहे. व्हिडिओमध्ये फरमानी तिच्या स्टुडिओमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती देत ​​आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही फरमानीच्या स्टुडिओमध्ये कसं काम केलं जातं ते देखील पाहू शकता. हा व्हिडिओ लोकांना प्रचंड पसंत पडत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात