मुंबई, 2 ऑगस्ट : सोशल मीडिया आणि स्वस्त इंटरनेटमुळे अनेक लोक रात्रीतून स्टार झाल्याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहित असतील. यात काही यशस्वी झाले तर काही पुन्हा आहे त्याच स्थितीत आले. अशाच एका व्हायरल व्हिडीओमुळे एक मुलगी प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ‘हर हर शंभू’ हे भजन तुमच्याही अनेकदा कानावर पडले असेल. या भजनाने अल्पावधितच भाविकांची मने जिंकली. मात्र, आता हे भजन गाणाऱ्या फरमानी नाझ या गायिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. हे भजन अबालवृद्ध, महिलांपासून तरुणांपर्यंत सर्वांनाच आवडत असताना काही लोकांना फरमानी नाझने गायलेलं भजन आवडलं नाही. त्यांनी तिला विरोध करण्यास सुरुवात केली आहे. ‘इंडियन आयडल सीझन 12’ मध्ये फरमानी नाझ सहभागी हर हर शंभू भजन गाणारी फरमानी नाझ मूळची उत्तर प्रदेशातील मुझफ्फर नगरची आहे. फरमानी नाझला एक छोटा मुलगा देखील आहे. फरमानी नाझच्या पतीने घटस्फोट न देता दुसरे लग्न केले होते, त्यानंतर ती तिच्या माहेरच्या घरात राहून स्वतःच्या मुलाचे संगोपन करत आहे. फरमानी नाझ काही काळापूर्वी ‘इंडियन आयडॉल सीझन 12’ या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. परंतु, तिने तिच्या आजारी मुलावर उपचार करण्यासाठी शो मध्येच सोडला होता. हर हर शंभू या गाण्यावरून काय आहे वाद? फरमानीचे सोशल मीडियावरही लाखो फॅन फॉलोअर आहेत. ती तिच्या भावासोबत गावा-गावातल्या गल्लीबोळात गाते. आर्थिक विवंचनेमुळे रस्त्यावर गाणी गाणारी मुलगी आपल्या सुरेल आवाजाच्या आणि मेहनतीच्या जोरावर ‘इंडियन आयडॉल’पर्यंत पोहोचली. तिला तिथे पाहून चाहत्यांनाही खूप आनंद झाला. फरमानी नाझचे स्वतःचे यूट्यूब चॅनल देखील आहे, ज्याचे 3.84 मिलियन सब्सक्रायबर आहेत. फरमानी नाझच्या ‘हर हर शंभू भजन’वर देवबंद उलामांनी (Deoband Ulamas) याला शरियतच्या विरोधात म्हटले आहे आणि पश्चात्ताप करण्याचा फतवा काढला आहे. Dia Mirza वर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन फरमानी नाझ कोण आहे? 2017 मध्ये फरमानीचा विवाह मेरठच्या इमरानसोबत झाला होता. काही काळानंतर त्यांना मूल झाले, त्यानंतर सासरच्यांनी फरमानीला त्यांच्या मुलाचे वैद्यकीय बिल भरण्यास सांगितले. फरमाणी ही घरगुती महिला होती, त्यामुळे तिला बिल भरणे शक्य नव्हते. अशा स्थितीत सासरच्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केल्यावर ती आपल्या माहेरच्या घरी येऊन राहू लागली. अशी प्रसिद्धी मिळाली फरमानीला गाण्याची खूप आवड होती. घरात काम करताना ती गाणी म्हणायची. फरमानीचा आवाज ऐकून एका व्यक्तीने तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. फरमानीचा हा व्हिडिओ लोकांना इतका आवडला की या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून फरमानीने तिचे आणखी व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली आणि एक दिवस असा आला जेव्हा फरमानी टीव्ही रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल सीझन 12’ मध्ये पोहोचली. शोच्या सर्व परीक्षकांनी तिच्या आवाजाचे खूप कौतुक केले. फरमानीने तिच्या मुलाच्या आजारपणामुळे शो मध्येच सोडला. परंतु, ती वेळोवेळी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करत राहिली. यातून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. काही काळापूर्वी तिने हर हर शंभू भजन गायले आणि ते यूट्यूबवर अपलोड केले, त्यावरून आता वाद सुरू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.