मुंबई, 11 फेब्रुवारी: आपल्या क्युटनेसनं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री जान्हवी (Janhvi Kapoor) कपूर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सध्या ती आगामी चित्रपट ‘गुड लक जेरी’च्या (Good Luck Jerry) शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढत तिनं आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये ती चक्क रिक्षा चालवताना दिसत आहे. (Janhvi Kapoor drives an e-rickshaw) ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या उत्तर भारतात सुरू आहे. यावेळी चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी अनेक रिक्षा मागवल्या होत्या. त्यातीलच एक रिक्षा चालवून जान्हवी सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. ही रिक्षा चालवतानाचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला आहे. या व्हिडीओत रिक्षात मागे बसलेली मंडळी तिला मार्गदर्शन करताना दिसत आहेत.
“बस…बस… पुढे रस्ता नाही. तुला आता यूटर्न घ्यावा लागेल.”, असं म्हणत ते जान्हवीला थांबण्याची विनंती करत आहेत. पण जान्हवीला मात्र आणखी पुढे जायचं आहे. त्यामुळे मग मागे बसलेले लोक आम्हाला वाचवा अशा गंमतीशीर अंदाजात आरडाओरडा करत आहेत. दरम्यान जान्हवीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत लाखो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत रिक्षा चालवणाऱ्या जान्हवीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. हे वाचा - अखेर कंगनाने घेतली माघार, अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी BMC कडे करणार अर्ज! ‘गुड लक जेरी’ या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. या चित्रपटात जान्हवीसोबत दीपक डोब्रियाल, मिता वशिष्ट, निरज सूद यांसारखे अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. ‘रांझना’, ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’, ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘मुक्काबाज’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांचं दिग्दर्शन करणारे आनंद एल राय यांनी ‘गुड लक जेरी’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. हा चित्रपट ‘कोल्लामाऊ कोकिला’ या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल अशी शक्यता आहे.