जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘मला किस करशील का?’; चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवीनं दिलं अजब उत्तर

‘मला किस करशील का?’; चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवीनं दिलं अजब उत्तर

‘मला किस करशील का?’; चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवीनं दिलं अजब उत्तर

जान्हवीनं आस्क मी एनिथिंग या लाईव्ह सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तर दिली. एका चाहत्यानं तर तिला किस करण्याची इच्छा देखील व्यक्त केली. पाहा या अजब चाहत्याच्या प्रश्नावर जान्हवीनं दिलेलं गजब उत्तर

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई 22 मार्च**:** बॉलिवूडमधील (Bollywood) नवीन पिढीतील एक देखणी स्टार म्हणजे जान्हवी कपूर (Janhvi Kapoor). दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांची ही कन्या सध्या आपल्या सौंदर्यानं लाखो रसिकांना घायाळ करत आहे. ‘द कारगिल गर्ल: गुंजन सक्सेना’ (The Kargil Girl: Gunjan Saxena) या चित्रपटानंतर रुही (Ruhi) या थरारपटातून तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता ती गुड लक जेरी (Good Luck Jerry) या चित्रपटातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. पंकज मट्टा लिखित आणि सिध्दार्थ सेनगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. नवीन पिढीतील स्टार्सप्रमाणे जान्हवी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संपर्क साधत असते. नुकताच तिनं इन्स्टाग्रामवरील (Instagram) ‘आस्क मी एनीथिंग’ (Ask me Anything) या कार्यक्रमातून चाहत्यांशी संवाद साधला. यामध्ये तिनं चाहत्यांच्या प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरं दिली. तिच्या हजरजबाबीपणामुळं चाहतेही खुश झाले असून, त्यांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. अवश्य पाहा - टीकेची पर्वा कुणाला…करण जोहर आणखी एका स्टार किडला करतोय लॉन्च या कार्यक्रमात तिनं तिचं डाएट, ती केसांची काळजी कशी घेते इथपासून ते तिचा अविस्मरणीय प्रवास, आवडता सहकलाकार, ओटीटी प्लेटफॉर्मवरील तिची आवडती सिरीज अशा अनेक प्रश्नांची अगदी मनापासून उत्तरं दिली आहेत. तिनं या उत्तरांचे फोटोही शेअर केले आहेत. याच कार्यक्रमात एका चाहत्यानं तिला किस (Kiss) करायची इच्छा असल्याचं सांगितलं, यावर जान्हवीनं अगदी भन्नाट उत्तर दिलं, तेही कृतीतून. तिनं सरळ आपल्या तोंडावर मास्क (Mask) चढवला आणि नो असं लिहित आपला नकार स्पष्ट केला.

    null

    जान्हवीनं या वेळी सेटवर तिला फॅटी कपूर (Fatty Kapoor) अशी हाक मारली जात असल्याचंही सांगितलं. अशी हाक मारतात तेव्हा कसं वाटतं असं विचारल्यावर फन असं उत्तर तिनं दिलं आहे. सेटवर जेवत असतानाचा एक फोटोही तिनं शेअर केला आहे. त्याचबरोबर तिचा आवडता कलाकार कोण या प्रश्नाचं उत्तर देताना तिनं दी कारगिल गर्ल – गुंजन सक्सेना या चित्रपटातील सहकलाकार पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) याचं नाव घेतलं. त्यांच्या सोबतचा चित्रपटातील एका दृश्याचा फोटोही तिनं शेअर केला आहे. तिचा अविस्मरणीय प्रवास कोणता असं विचारलं असता, दोन वर्षांपूर्वी आई-वडिलांबरोबर केलेली दक्षिण फ्रान्सची सहल असं तिनं सांगितलं. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा समुद्र न्याहाळत असतानाचा एक पाठमोरा फोटो तिनं याबरोबर शेअर केला आहे. गुंजन सक्सेना चित्रपटातील एक आवडती आठवण विचारली असता, शरण शर्मा याला सेटवर ती त्रास देत असे ती आठवण तिनं फोटोसह शेअर केली आहे. तिच्या डाएटबाबत (Diet) उत्तर देताना आईस्क्रीमचा कप हातात असलेला एक फोटो शेअर करून चार स्कूप रोज असं तिनं म्हटलं आहे, तर शीटस क्रीक (Sheet’s Creek) ही ओटीटी प्लेटफॉर्मवरील तिची आवडती सिरीज असल्याचं तिनं सांगितलं आहे. सगळ्यात छान उत्तर तिनं काळजीमुक्त कसं राहावं या प्रश्नाला दिलं आहे. याच्या उत्तरादाखल तिनं लिहिलं आहे की, एका मोठ्या उशीला घट्ट मिठी मारा आणि गाणी म्हणा. याबरोबर जब वी मेट या चित्रपटातील आओगे जब तुम वो साजना … हे गाणं गात असतानाचा तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती कब आयेगा असं देखील विचारत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात