अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळं बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाळून बाहेर आला आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
2/ 10
त्यामुळं अनेक कलाकार आणि त्यांच्या सेलिब्रिटी कुटुंबीयांवर सध्या जोरदार टीका होत आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
3/ 10
मात्र या घराणेशाहीच्या वादात निर्माता, दिग्दर्शक करण जोहर केंद्रस्थानी आहे. त्यानं आजवर अनेक सेलिब्रिटी किड्सला लॉन्च केलं त्यामुळं त्याच्यावर सध्या जोरदार टीका होत आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
4/ 10
परंतु प्रेक्षकांच्या टीकेची पर्वा न करता करण आता आणखी एका सेलिब्रिटी किडला लॉन्च करण्याची तयारी करत आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
5/ 10
अभिनेता संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
6/ 10
करणनं सोशल मीडियाद्वारे ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
7/ 10
शनाया लवकरच धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून, तिचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
8/ 10
शनायानं देखील आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट करुन पदार्पणाची घोषणा केली आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
9/ 10
अर्थात शनाया कुठल्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एँट्री घेणार याबाबत करणनं काहीही माहिती दिलेली नाही. मात्र येत्या जुलै महिन्यात तो चित्रपटाची घोषणा करणार आहे. (Shanaya Kapoor/Instagram)
10/ 10
करणच्या या घोषणेमुळं सध्या त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. (Shanaya Kapoor/Instagram)