मुंबई, 3 ऑगस्ट- मनीष पॉलने (Maniesh Paul) अभिनय, होस्टिंग, कॉमेडी, रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. मात्र त्याला सर्वात जास्त पसंती होस्टच्या भूमिकेत मिळते. त्याने आजपर्यंत अनेक मोठमोठे शोचं होस्टिंग केलं आहे. यामध्ये त्याने सर्वांनाचं आपल्या कॉमेडी (Comedy) अंदाजाने हसवून लोटपोट केलं आहे. तसेच आपल्या हजरजबाबीपणाने सर्वांनाचं अवाक् केलं आहे. मनीषच्या उपस्थितीने प्रत्येक कार्यक्रमात विनोदाचा आणि आंनदाचा तडका लागतो. आज मनीषचा वाढदिवस (Birthday) आहे. यानिमित्ताने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया.
View this post on Instagram
मनीषचा जन्म 3 ऑगस्ट 1981 मध्ये झाला होता. तो एका पंजाबी कुटुंबातील मुलगा आहे. मनीषने आजपर्यंत टीव्हीवरील अनेक मोठे शो होस्ट केले आहेत. डान्स इंडिया डान्स, नच बलिये, झलक दिखला जा, कॉमेडी सर्कस आणि सलमान खानच्या ‘दबंग द टूर’ अशा शो चा समावेश आहे.
(हे वाचा: कपूर बहिणींचं Sisters Day सेलिब्रेशन; Video शेअर करत केली अशी मजा)
मनीष दिल्लीचा रहिवाशी आहे. त्याने सुरुवातीला कॉलेजमध्ये होस्टिंग केलं होतं. त्यानंतर त्याला स्टार प्लसच्या ‘संडे टँगो’ या शो साठी होस्टिंग करण्याची संधी मिळाली होती. एक वेळ अशी होती की मनीषचं वजन खुपचं जास्त होतं. तो अगदी गोलूमोलू होता. त्यावेळी त्याला बॉलिवूडचा दबंग सलमान खानची मोठी मदत मिळाली होती. सलमानने त्याला फिट होण्यासाठी मदत केली होती.
(हे वाचा: ऐसो मन होये...! पाहा, कृष्णभक्तीत लीन झालेल्या धडाकेबाज IAS ऑफिसरचं भजन)
एका मुलाखतीदरम्यान त्यानं सांगितलं होतं की, ‘2015 मध्ये मला सलमान खानच्या ‘दबंग’ च्या वर्ल्ड टूरसाठी काम करण्यासाठी फोन आला होता. मात्र त्यावेळी मी सलमान सरांना फोन केला आणि आपल्या तब्ब्येतीबाबत सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला दिलासा देत सांगितल, तू सध्या आपल्या फिटनेसवर लक्ष दे कारण वर्ल्ड टूर पुढच्या वर्षी होणार आहे. त्यावेळी मी खुपचं खुश झालो आणि आणि फिट व्हायचं ठरवलं’. सलमानच्या या शोमुळे मनीषचं नशीब पालटलं यांनतर त्याला अनेक चांगल्या शोच्या संधी मिळाल्या आणि त्याने कधीचं मागे वळून पाहिलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment