मुंबई, 02 जुलै: कधी आक्कासाहेब तर कधी सौंदर्या बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ब्युटिफुल हर्षदा खानविलकर
( Harshada Khanvilkar Birthday) मालिका असो सिनेमा किंवा रंगभूमी सर्वच ठिकाणी हर्षदानं तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या रंग माझा
( Rang Majha Vegla) वेगळा मालिकेत साकारलेली सौंदर्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतलरी आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर आज तिचा 49 वाढदिवस साजरा करत आहे. मराठी सिनेसृष्टीची 'मम्मा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हर्षदाला सगळ्यांकडून शुभेच्छा आणि प्रेमाचा वर्षाव होतोय. हर्षदानं आजवर सिनेसृष्टीत भूमिका कमी केल्या असल्या तरी तिनं लाखमोलाची माणसं आपल्या गाठीशी बांधून ठेवली आहेत. हर्षदाच्या वाढदिवशी तिच्या भाचीनं तिच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिची भाची म्हणजेच धृती संजय जाधव
( Dhriti Sanjay Jadhav) धृतीनं लिहिलेली पोस्टची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.
धृतीनं एक छोटासा व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती आणि हर्षदा एकमेकांविषयी बोलत आहेत. धृती हर्षदा 'मालू' या नवानं हाक मारते. हर्षदा धृतीच्या लहानपणीच्या गोष्टींची तिला आठवण करुन देत तिच्यावर असेलेलं प्रेम व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे धृतीनं हर्षदासाठी भली मोठी पोस्ट देखील शेअर केलीय. तिनं म्हटलंय, 'मालू हा सामान्य शब्द आहे ज्याचा अर्थ आई किंवा मावशी किंवा बेस्ट फ्रेंड असा होतो. मी शेअर केलेला व्हिडीओ मालू माझ्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे, माझं आयुष्य किती तिच्याभोवती फिरत हे दाखवून देणारा आहे'.
हेही वाचा -
बाप लेकीची होणार भेट; अवंतिकाला पाहताच चढणार दादांचा पारा
धृतीनं पोस्टमध्ये पुढे म्हटलंय, 'मालू शिवाय मी मोठीच झाले नसते. मी नेहमीच तिच्यासाठी सश्याचे दोन दात असेलेली मुलगी आहे. मला डायपरमध्ये दरवाज्यात धावताना पाहण्यापासून विदेशात जाण्यासाठी मला विमानात बसवण्यापर्यंत. माझं बदलेलं करिअर पाहण्यापासून ते मला माझ्या आयुष्याचा रस्ता शोधण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यापर्यंत. तसंच मला लहान मुलांचे कपडे घातलेले पाहण्यापासून ते तुझी साडी उधार घेऊन नेसण्यापर्यंत, अशा अनेक गोष्टी तू पाहिल्या आहेस. गॉडमदरची जर काही भाषा असेल तर त्यांनी तुझ्याकडून काही टिप्स घ्यावात'.
तर शेवटी धृतीनं हर्षदाचे आभार देखील मानलेत, तिनं म्हटलंय, 'मला योग्यरित्या मोठं करण्यासाठी, माणूस म्हणून कसं जगायचं आणि प्रेमात कोणत्याच अपेक्षा करू नये हे शिकवण्यासाठी खूप थँक्यू, हॅपी बर्थ डे. तू नेहमीच माझ्यासाठी नंबर वन राहशील'.
धृतीनं शेवटी हर्षदाकडे रिटर्न गिफ्टही मागितलं आहे. तिनं म्हटलंय, 'चला इव्हेंट येतोय साडी देऊन टाका आणि मेकअपही संपलाय तोही द्या'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.