• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Shocking! प्रसिद्ध अभिनेत्रीवर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न; थोडक्यात बचावली, मात्र हाताला दुखापत

Shocking! प्रसिद्ध अभिनेत्रीवर अ‍ॅसिड हल्ल्याचा प्रयत्न; थोडक्यात बचावली, मात्र हाताला दुखापत

अभिनेत्रीची प्रकृती स्थिर आहे. तिच्या हाताला जखम झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 20 सप्टेंबर : मुंबईतील (Mumbai News) अंधेरी भागात प्रसिद्ध अभिनेत्री पायल घोष हिच्यावर (Payal Ghosh attacked) अज्ञातांनी हल्ला करून जखमी करण्याचा प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांनी अभिनेत्रीवर अॅसिड फेकण्याचाही प्रयत्न केला होता, असा दावा अभिनेत्रीने केला आहे. पायल घोष हिने दिलेल्या माहितीनुसार, ती मुंबईतील अंधेरी भागातून घरी परतत होती. ती कारमध्ये बसणार एवढ्यात अचानक अज्ञातांनी तिच्यावर हल्ला केला. अभिनेत्रीनं सांगितलं की, त्या व्यक्तीकडे अॅसिडदेखील होतं. आणि त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता. या घटनेनंतर अभिनेत्रीच्या हाताला जखम झाली आहे. (Attempted acid attack on famous actress Payal Ghosh) अभिनेत्रीने सांगितला घटनाक्रम.. पायलने दावा केला आहे की, मी ड्रायव्हिंग सीटवर बसणार होते, तेवढ्यात काहीजण आले व त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हातात अॅसिडदेखील होतं. यानंतर मी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळाले. त्यांनी माझ्या डोक्यावर रॉडने वार केला, सुदैवाने फार जखम (Payal Ghosh has minor injuries) झाली नाही. त्यांनी माझ्यावर हातावरही मारलं. मात्र मी त्यांचा चेहरा पाहू शकले नाही. मी या प्रकरणात भावासोबत जाऊन तक्रार दाखल करेन. हे ही वाचा-Bigg Boss 15...सलमान खान...14 आठवडे आणि थेट 350 कोटी! अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाला लावला होता आरोप अभिनेत्री पायल घोषने प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावून (Actress Payal Ghosh had accused famous director Anurag Kashyap of sexual harassment) गोंधळ उडवला होता. यासाठी तिने ट्विट कर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. याला आता बरीच वर्षे लोटली आहेत. कश्यप यांनी हे आरोप फेटाळले होते. पोलिसांनी या प्रकरणात अनुराग कश्यप याची चौकशीही केली होती.
  Published by:Meenal Gangurde
  First published: