प्रियकाचं अमेरिकेत दिवाळी सेलिब्रेशन, निक सोबतचा रोमॅन्टीक फोटो व्हायरल

प्रियकाचं अमेरिकेत दिवाळी सेलिब्रेशन, निक सोबतचा रोमॅन्टीक फोटो व्हायरल

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असून प्रियंकाच्या चेहेऱ्यावर निखळ असं हास्य आहे.

  • Share this:

मुंबई 28 ऑक्टोंबर : हॉलिवूडमध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवणारी बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) लग्नानंतर अमेरिकत(US) स्थायिक झाली असली तरी तिचं भारताचं प्रेम कमी झालेलं नाही. भारतीय सण- उत्सव ती अतिशय आवडीनं अमेरिकत सेलिब्रेट करत असते. तिचा नवरा निक जोनासही  (Nick Jonas) तिला त्यासाठी प्रोत्साहन तर देतोच पण त्यात आनंदाने सहभागीही होत असतो. करवाचौथ नंतर प्रियंका निक जोनास सोबत आता दिवाळी  (Diwali) साजरी करतेय. या उत्सवाचे निक सोबतचे रोमॅन्टीक फोटो तिने Instagramवर शेअर केले आहेत. प्रियंकाच्या फॅन्सनी तिचं कौतुक केलं असून तिचे हे फोटो व्हायरलहीहोत आहेत.

प्रियंकाने निक सोबतचा जो फोटो शेअर केलाय त्यात ते घराच्या टेरेसवर उभे आहेत. प्रियंकाने साडी नेसलीय आणि त्यात ती सुंदर दिसतेय. तर निक हा कॅज्युअल्समध्ये आहे. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत असून प्रियंकाच्या चेहेऱ्यावर निखळ असं हास्य आहे. निकच्या पायांमध्ये चप्पलही नाहीये. हा रोमॅन्टीक फोटो टाकून प्रियंकाने दिवळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 'Happy Diwali to everyone celebrating. From mine to yours...

त्याचबरोबर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रियंका आणि निक आपल्या कुटुंबियांसोबत असून घर दिव्यांनी सजवलेलं आहे. तसच घरातले इतर सदस्यही सेलिब्रेशनच्या मुडमध्ये दिसत आहेत. या आधी प्रियंकाने निक सोबत करवाचौथही साजरा केला होता. त्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंवर लोकांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत निक जोनासचाही आवर्जुन उल्लेख केलाय. प्रत्येक सणांमध्ये निक प्रियंकाच्या बरोबरीने आनंदाने सहभागी होते ही चांगली गोष्ट आहे असं प्रेक्षकांनी म्हटलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 12:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading