मुंबई, 29 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा प्रसारित करण्यात आलेला एकेकाळचा लोकप्रिय टीव्ही शो रामायण सध्या सगळीकडेच चर्चेत आहे. अशातच आज या मालिकेत सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांचा आज वाढदिवस. अभिनय क्षेत्रातील यशानंतर 1991 मध्ये दीपिका यांनी राजकारणात प्रवेश करत भाजपकडून निवडणूक लढवली होती आणि त्यावेळी देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यांच्या वाढदिवसानिमि्त्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दल न ऐकलेल्या काही गोष्टी...
1. दीपिका चिखलिया यांनी वयाच्या 14 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी सुरुवातीच्या काळात काही जाहिरातींमध्ये काम केलं होतं. पण सीतेची भूमिका साकारल्यानंतर त्या भूमिकेचा त्यांच्या जीवनावर एवढा परिणाम झाला की त्यांना इतर कोणत्याही भूमिकेत स्वीकारलं नाही.
2.दीपिका चिखलिया यांनी साकारलेली सीतेची भूमिका एवढी लोकप्रिय झाली होती की, त्या बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध झाल्या होत्या. जेव्हा त्यांचं लग्न हेमंत टोपीवाला यांच्याशी झालं त्यावेळी बॉलिवूड सुपरस्टार राजोश खन्ना यांनी त्याच्या लग्नात हजेरी लावली होती.
3. अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यावर दीपिका यांनी राजकारणात एंट्री केली होती. गुजरातच्या वडोदरा सीटवर त्यांनी 1991 मध्ये भाजपकडून निवडणूक लढवली आणि त्या जिंकल्या सुद्धा त्यांनी राजा रणजीत सिंह गायकवाड यांना 50 हजार पेक्षा जास्त मतांनी हरवलं होतं.
4. या निवडणूकीच्या प्रचारात त्यांना सर्वाधिक मदत ही रामायणात रावणाची भूमिका साकाणारा अभिनेता अरविंद त्रिवेदी यांनी केली होती.
5. दीपिका चिखलिया यांच्या निवडणूक प्रचारात त्यावेळी देशाचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा त्यांच्या मतदार संघात गेले होते. त्यावेळी ते गुजरातमधील भाजपचे एक दमदार नेते होते.
6. दीपिका चिखलिया यांच्या प्रचारात भाजपचे वरिष्ठ नेता लाल कृष्ण अडवाणी यांनीही हजेरी लावली होती.
7.काही दिवसांपूर्वीच खऱ्या सीतेच्या जन्म स्थानावरून बरेच वाद विवाद झाले होते. मात्र दीपिका यांचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे.
8. रामायण मालिकेनंतर दीपिका चिखलिया यांनी एका शोमध्ये रामायणातील लक्ष्मण म्हणजे अभिनेता सुनिल लहरी यांच्यासोबत काम केलं होतं. यावेळी त्यांचे रोमँटिक फोटो खूप व्हायरल झाले होते.
9. काही दिवसांपूर्वी जेव्हा या शोमध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनी सरकारनं आम्हाला कोणताही पुरस्कार केला नाही असं म्हटलं होतं. ज्यानंतर दीपिका यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता.
10. मागच्या काही वर्षांपासून दीपिका अभिनय क्षेत्रात फारशा दिसल्या नाहीत. त्या मोकळ्या वेळेत पेंटिंग करण्यासोबतच आपल्या नवऱ्याच्या कंपनीमध्ये त्याच्या कामात मदत करतात.
Published by:Megha Jethe
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.