मुंबई, 13 मे- एकीकडे अमेरिकेत (America USA space mission) पर्यटकांना म्हणजे सामान्य नागरिकांना अंतराळात पाठवण्यासाठी SpaceX सारखी कंपनी तयारी करते आहे. तर या अंतराळातल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रशियात तर सिनेमाचं शूटिंग अंतराळात करायचे घाट घातले जात आहेत. रशियाने (Russian space mission) येत्या ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकवर (International Space Station) सिनेमाचा क्रू पाठवायचा निर्णय घेतला आहे.
5 ऑक्टोबर 2021 ला अभिनेत्री आणि दिग्दर्शकाला स्पेस स्टेशनवर पाठवण्यात येणार आहे. अंतराळात शूट होणारा हा पहिलाच सिनेमा ठरणार आहे. याशिवाय काही अब्जाधीश
डिसेंबरमध्ये जपानी अब्जाधीश युसाकू मेझावा (Yusaku Meazawa) या अब्जाधीशाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात नेण्याची योजना आहे. ऑनलाइन रिटेलमध्ये आपले भविष्य घडविणाऱ्या 45 वर्षीय मेझावा म्हणाले, या मिशनची रूपरेषा तयार करुन ते आपल्या यूट्यूब वाहिनीवर जगभरात 7००,००० पेक्षा जास्त युजर्स पर्यंत पोहचविण्याची त्यांची इच्छा आहे. रोजकोस्मोस स्पेस एजन्सीने सांगितले की, मेझावा कझाकस्तानमधील बायकोनूर कॉसमोड्रोम येथून प्रॉडक्शन असिस्टंट योझो हिरानो यांच्या सोबत एक ‘सोयूज एमएस -20 अंतराळ यान’ 8 डिसेंबर रोजी अंतराळात जाणार आहे.
मेझावा यांनी म्हटलं आहे, ‘मी खूप उत्सुक आहे 'अंतराळात आयुष्य कसे आहे?' हे जाणून घेण्यासाठी. म्हणून मी स्वतःहून शोध घेण्याचा आणि माझ्या YouTube चॅनेलवर जगाबरोबर तो अनुभव शेयर करण्याचा विचार करीत आहे.
(हे वाचा:नक्की कोणावर होणार कारवाई? श्वेता-अभिनवमधील वादात महिला आयोगाची एण्ट्री )
पहिली रशियन स्पेस फिल्म बनविण्याच्या उद्देशाने रोझकोस्मोसने गुरुवारी स्वतंत्रपणे घोषणा केली, की ते ऑक्टोबरमध्ये ISS ला एक अभिनेत्री आणि दिग्दर्शक पाठवणार आहेत. या चित्रपटाचे कामकाज "चॅलेंजिंग" आहे. रोस्कोसमॉसचे प्रमुख दिमित्री रोगोजिन आणि सरकारी वाहिनी ‘चॅनल वन’ हे या फिचर फिल्मचे सह-निर्माता आहेत.
मागील वर्षी नासाने जाहीर केलेल्या या घोषणेनंतर अभिनेता टॉम क्रूझबरोबर ISS वर हॉलिवूड चित्रपट बनवण्यासाठी एकत्र येणार असल्याची देखील पुष्टी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Film, Film star, Russia, Space, Space Centre