जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / बस ड्रायव्हरचा मुलगा आहे KGF स्टार यश, जाणून घेऊया त्याच्या अभिनयातील प्रवास, Love Story आणि बरंच काही

बस ड्रायव्हरचा मुलगा आहे KGF स्टार यश, जाणून घेऊया त्याच्या अभिनयातील प्रवास, Love Story आणि बरंच काही

बस ड्रायव्हरचा मुलगा आहे KGF स्टार यश, जाणून घेऊया त्याच्या अभिनयातील प्रवास, Love Story आणि बरंच काही

आज आपण अभिनेता यशबद्दल (Unknown facts about Actor Yash) माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11 एप्रिल: प्रसिद्ध साऊथ सुपरस्टार (South Superstar) यशचा (Yash) ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF Chapter 2’ 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) यांच्यासह साऊथ अभिनेत्री श्रीनिधी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचा नायक असलेला यश हा साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता असून त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. पण अभिनेता यशचं खरं नाव, त्याचं गाव आणि त्याच्या कुटुंबाविषयी (Actor Yash Family) फार लोकांना माहीत नाही. आज आपण अभिनेता यशबद्दल (Unknown facts about Actor Yash) माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. अभिनेता यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील बूवनहळ्ळी गावात झाला. त्याचं खरं नाव नवीन कुमार गौडा (Navin Kumar Gowda) आहे. चित्रपटसृष्टीत आल्यानंतर त्याने स्वतःचं यश हे नाव ठेवलं. यशचे वडील अरुण कुमार हे कर्नाटक रोडवेज आणि बंगळुरू मेट्रो रोडवेजमध्ये बस चालक असून आई गृहिणी आहे. आई-वडिलांकडून यशला चांगले संस्कार मिळाले. यशला नंदिनी नावाची एक लहान बहीणदेखील आहे. म्हैसूरमध्ये त्याच्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर यशने बी.व्ही. कारंथ यांचा प्रसिद्ध नाट्य समूह ‘बेनाका ड्रामा ट्रूप’मध्ये अभिनयातील बारकावे शिकले. यशने 2004 मध्ये ईटीव्ही कन्नडवर प्रसारित होणाऱ्या ‘नंद गोकुळ’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर यशला 2008 मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक शशांकच्या ‘मोगिनी मनसू’ चित्रपटात संधी मिळाली. या चित्रपटात त्याने सहाय्यक भूमिका केली होती. चित्रपटांपूर्वी टेलिव्हिजनमध्ये त्याच्यासोबत काम करणारी अभिनेत्री राधिका पंडित (Radhika Pandit) ही त्याच्या पहिल्या चित्रपटाची नायिका होती. पुढे तिच्याशीच यशने लग्न केलं. दरम्यान, याच वर्षी यशला मुख्य भूमिका असणारा चित्रपट मिळाला. त्याने ‘रॉकी’ चित्रपटात (Rocky Movie) मुख्य भूमिका साकारली होती. अमर उजालाने यासंदर्भात वृत्त दिलंय. यशने 2008मध्ये पहिला चित्रपट केला असला तरी 2010 साली प्रदर्शित झालेला ‘मोडसल’ हा त्याचा पहिला हिट चित्रपट मानला जातो. त्यानंतर आलेल्या ‘राजधानी’ या चित्रपटानंतर लोक त्याला ओळखू लागले. हा चित्रपट यशच्या करिअरचा टर्निंग पॉइंट मानला जातो. 2012 साली प्रदर्शित झालेल्या ‘ड्रामा’ या चित्रपटाने यशला कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार (Kannada Superstar) बनवलं. यशच्या हिट चित्रपटांमध्ये ‘किरातका’, ‘गुगली’, ‘राजा हुली’, ‘गजकेसरी’, ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’, ‘मास्टरपीस’ आणि ‘संथू स्ट्रेट फॉरवर्ड’ यांचा समावेश आहे. 2018 मध्ये, ‘KGF Chapter 1’ या चित्रपटाने यशला देशभरात लोकप्रियता मिळवून दिली. खासगी शाळेतल्या 5 विद्यार्थ्यांना Corona ची लागण, शाळेनं घेतला मोठा निर्णय 2014 साली आलेला यशचा राधिका पंडितसोबतचा ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’ हा चित्रपट कन्नड चित्रपटसृष्टीचा सर्वांत मोठा हिट ठरला होता. याच चित्रपटाने त्याला कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या स्टारचा दर्जाही मिळवून दिला होता. या चित्रपटानंतर राधिका पंडित आणि यशच्या अफेअरच्या (Yash Radhika Pandit Love Story) चर्चा सुरू झाल्या. या दोघांचाही हा तिसरा चित्रपट होता. त्यानंतर या दोघांनी 12 ऑगस्ट 2016 रोजी गोव्यात एंगेजमेंट करत त्यांच्या नात्याबद्दल सर्वांना सांगितलं. त्याच वर्षी 9 डिसेंबरला दोघांनी लग्न केलं. यशने आपल्या लग्नाचे रिसेप्शन बेंगळुरू पॅलेसमध्ये (Bengaluru Palace) ठेवले होते आणि या रिसेप्शनमध्ये राज्यातील सर्व लोकांना आणि त्याच्या चाहत्यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच्या या कृतीमुळे त्याचं चांगलंच कौतुक झालं होतं. दरम्यान, यश आणि राधिका यांना एक मुलगा अथर्व आणि एक मुलगी आर्या आहे. अभिनेता यशने त्याची पत्नी राधिका पंडितसोबत 2017 मध्ये यश मार्ग फाउंडेशनची (Yash Marg Foundation) स्थापना केली. या संस्थेने कर्नाटक जिल्ह्यातील कोप्पळ जिल्ह्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील तलावांची स्वच्छता आणि टंचाईग्रस्त गावांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी यशने त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे 4 कोटी रुपये या प्रकल्पासाठी दिले आहेत. Alia Bhattच्या लग्नाचा ड्रेस डिझाईन करण्यात बिझी आहेत ‘हे’ प्रसिद्ध डिझायनर दरम्यान, यशचा KGF Chapter 2 हा चित्रपट खऱ्या कथानकावर आधारित आहे. या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे. प्रसिद्ध साऊथ चित्रपट KGF ची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की पहिल्या भागानंतर लोक सिक्वेलची मागणी करू लागले होते. त्यानंतर यश आणि टीमने चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. ज्या सोन्याच्या खाणीवर (Gold Mine) चित्रपटाची कथा आहे त्याचा इतिहास सुमारे 121 वर्षांचा आहे. शिवाय दुसऱ्या चाप्टरमध्ये संजय दत्त जी भीतीदायक व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे ती काल्पनिक नसून सत्य कथेवर आधारित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood
  • First Published :
जाहिरात
जाहिरात