मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Alia Bhatt लग्नात परिधान करणार 'या' दोन प्रसिद्ध डिझायनरनं तयार केलेला Dress

Alia Bhatt लग्नात परिधान करणार 'या' दोन प्रसिद्ध डिझायनरनं तयार केलेला Dress

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांच्या विवाहाची विशेष चर्चा फॅन्स आणि बॉलिवूडमध्ये (Bollywood) आहे. 14 एप्रिलला हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांच्या विवाहाची विशेष चर्चा फॅन्स आणि बॉलिवूडमध्ये (Bollywood) आहे. 14 एप्रिलला हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांच्या विवाहाची विशेष चर्चा फॅन्स आणि बॉलिवूडमध्ये (Bollywood) आहे. 14 एप्रिलला हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत.

नवी दिल्ली, 11 एप्रिल: बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींची अफेअर्स, विवाह सोहळे हा फॅन्ससाठी मोठा चर्चेचा विषय असतो. त्यातही विवाह सोहळा (Wedding Ceremony) हा अधिकच औत्सुक्याचा ठरतो. वेडिंग डेस्टिनेशनपासून ते आऊटफिटपर्यंत प्रत्येक गोष्टीची चर्चा होते. सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांच्या विवाहाची विशेष चर्चा फॅन्स आणि बॉलिवूडमध्ये (Bollywood) आहे. 14 एप्रिलला हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत. विवाहसोहळ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. हा विवाह सोहळा चार दिवस चालणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगानं रोज नवनवे अपडेट येत आहेत. लग्नाच्या दिवशी आलिया अत्यंत खास असा आऊटफिट (Outfit) परिधान करणार असल्याची सध्या चर्चा आहे. हा संपूर्ण विवाह सोहळा पेस्टल थीमवर (Pastel Theme) आधारित असेल. विवाह सोहळ्यादरम्यान आलिया प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यासाची मुखर्जी (Sabyasachi) आणि मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी खास डिझाईन केलेले आऊटफिट परिधान करणार आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती दिली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या रणबीर कपूर आणि आलिया यांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. आलियाचे काका रॉबिन यांनी नुकतीच या दोघांच्या विवाहाची तारीख निश्चित झाल्याचं सांगितलं. Indiatoday.in शी बोलताना रॉबिन यांनी या विवाहाच्या तारखेबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितलं आलिया आणि रणबीर यांचा विवाहसोहळा चार दिवस चालेल. हे दोघं 14 एप्रिलला विवाहबद्ध होतील. मेहंदी सोहळा 13 एप्रिलला पार पडेल. लग्न विधी आर.के. हाऊसमध्ये होतील.

सध्या आलिया आणि रणबीर शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. आलिया पनवेल येथे `रॉकी और रानी की प्रेम कहानी` या चित्रपटाचं शूटिंग करत आहे. तर रणबीर `लवरंजन` या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. शनिवारी आलिया आणि रणबीरच्या आगामी `ब्रह्मास्त्र` (Bramhastra) या चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज झालं. पोस्टरमधून या दोघांची इंटिमेट केमिस्ट्री पाहायला मिळते. आलियानं हे पोस्टर इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Account) शेअर करताना `लव्ह अँड लाईट` असं लिहिलं आहे. आलिया आणि रणबीरनं 29 मार्च रोजी या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. गेल्या पाच वर्षांपासून `ब्रह्मास्त्र`चं शूटिंग सुरू होतं. या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर हे दोघं एकमेकांना डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू झाली होती. 9 सप्टेंबर 2022 ला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

विवाहसोहळ्यादरम्यान आलियाचा आऊटफिट कोणतं असेल, याविषयीच्या चर्चेला काहीसा पूर्णविराम लागला आहे. आलिया विवाहावेळी सब्यासाचीनं डिझाईन केलेला खास लेहेंगा परिधान करेल. विवाहसोहळ्यातल्या अन्य फंक्शन्सवेळी मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये ती दिसेल. `एचटी`च्या वृत्तानुसार, सप्तपदीवेळी आलिया सब्यासाचीनं डिझाईन केलेला खास पिंक लेहेंगा परिधान करणार आहे. विशेष म्हणजे या लेहेंग्यासोबत मनीष मल्होत्रानं डिझाईन केलेला दुपट्टा देखील असेल. आलिया आणि रणबीरचा संपूर्ण विवाहसोहळा पेस्टल थीमवर आधारित असेल, असंही वृत्तात म्हटलं आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood, Marriage, Ranbir kapoor, Wedding