मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; 'सुपरमॅन' सारख्या चित्रपटांसाठी जातं ओळखलं

हॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; 'सुपरमॅन' सारख्या चित्रपटांसाठी जातं ओळखलं

रिचर्ड डोनर यांचा जन्म 1933 मध्ये न्यूयॉर्कमधील एका यहुदी कुटुंबात झाला होता.

रिचर्ड डोनर यांचा जन्म 1933 मध्ये न्यूयॉर्कमधील एका यहुदी कुटुंबात झाला होता.

रिचर्ड डोनर यांचा जन्म 1933 मध्ये न्यूयॉर्कमधील एका यहुदी कुटुंबात झाला होता.

मुंबई, 6 जुलै- सुपरमॅन, फ्रँचाइझी, द वेपन, लिटल गुनिजसारख्या प्रसिद्ध चित्रपटाचं दिग्दर्शन (Hollywood Director) करणारे रिचर्ड डोनर (Richard Donner) यांचं निधन (Death) झालं आहे. ते 91 वर्षांचे होते. त्यांचं सोमवारी निधन झालं आहे. याबद्दलची माहिती त्यांच्या पत्नी लॉरेन शूलर डोनर यांनी दिली आहे. मात्र त्यांनी त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण सांगितलेलं नाहीय.

" isDesktop="true" id="575565" >

रिचर्ड डोनर यांचा जन्म 1933 मध्ये न्यूयॉर्कमधील एका यहुदी कुटुंबात झाला होता. आपल्या करीयरच्या सुरुवातीला त्यांना एक अभिनेता व्हायचं होतं. मात्र नंतर त्यांनी दिग्दर्शनाचा मार्ग निवडला होता. त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची सुरुवात एका टीव्ही शोच्या माध्यमातून केली होती. डोनर यांनी ‘द रायफलमॅन, द ट्वाईलाईट झोन, गिलिगन्स आयलंड, पेरी मेसन या टीव्ही शोचं दिग्दर्शन केलं आहे. डोनर यांनी ‘एक्स 15’ च्या माध्यामतून फिचर फिल्मच्या दिग्दर्शनाला सुरुवात केली होती. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 15 वर्षानंतर म्हणजेच 1976 मध्ये आलेल्या ‘द ओमेन’ या हॉरर चित्रपटामुळे.

(हे वाचा:साथ निभाना साथिया' फेम कोकिला रुग्णालयात दाखल; चाहते चिंतेत!  )

रिचर्ड डोनर यांना 1985 मध्ये आलेल्या ‘द गुयनीज’ या कॉमेडी चित्रपटासाठी सुद्धा ओळखलं जातं. चित्रपट निर्माता स्टीवन स्पीलबर्ग यांच्या कथानकावर आधारित आणि ख्रिस कोलंबिसद्वारा लिखित या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटाने इतिहासात आपलं नाव उमठवलं आहे.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Hollywood