बिग बॉस फेम शहनाज गिल सध्या आपल्या लुकमुळे चांगलीच चर्चेत असते. शहनाजने वेट लॉस केल्यापासून ती अधिकचं हॉट दिसत आहे. शहनाज सतत आपले वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. चाहते तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमणात लाईक्स आणि कमेंट्स करत असतात. नुकताच शहनाजने व्हाईट आणि ब्ल्यू कलरच्या ड्रेस मध्ये फोटो शेयर केले आहेत. त्यामध्ये ती खुपचं क्युट दिसत आहे. या फोटोंवर एका चाहत्याने कमेंट करत ;क्या खूब लगती हो' असं म्हटलं आहे. बिग बॉसमुळे शहनाजला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. शहनाजचा चुलबुला स्वभाव मोठ्या प्रमणात लोकांना पसंत पडतो. शहनाजच्या फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.