मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /HBD: आपल्याच चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये नूतन यांना मिळाली नव्हती एन्ट्री, कारण...

HBD: आपल्याच चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये नूतन यांना मिळाली नव्हती एन्ट्री, कारण...

अभिनेत्री नूतन यांचा जन्म 4 जून 1936 मध्ये झाला होता.

अभिनेत्री नूतन यांचा जन्म 4 जून 1936 मध्ये झाला होता.

अभिनेत्री नूतन यांचा जन्म 4 जून 1936 मध्ये झाला होता.

मुंबई, 4 जून-  चित्रपटसृष्टीमध्ये(Film Industry) अनेक अवाक् करणाऱ्या घटना घडत असतात. अभिनेता(Actor)  किंवा अभिनेत्रीला (Actress)  कधी कोणत्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल सांगता येत नाही. असचं काहीसं झालं होतं, ज्येष्ठ अभिनेत्री नूतन(Nutan)  यांच्यासोबत.  नूतन यांना त्यांच्याच चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. आणि त्यांना चित्रपट न बघताच परतावं लागलं होत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया काय होता हा नेमका प्रकार.

View this post on Instagram

A post shared by Mohnish Bahl (@mohnish_bahl)

अभिनेत्री नूतन यांचा जन्म 4 जून 1936 मध्ये झाला होता. नूतन या अभिनेत्री शोभना समर्थ आणि कुमारसेन समर्थ यांच्या लेक होत्या. त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी बालकलाकार म्हणून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी 9 वर्षाची असताना आपल्या वडिलांच्या ‘नल दमयंती’ या चित्रपटात काम केल होतं.

(हे वाचा: HBD : बॉलिवूडची पहिली Bikini Girl; पाहा बेधडक नुतन यांचा थक्क करणार प्रवास )

14 व्या वर्षी त्यांनी ‘हमारी बेटी’ या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केल होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांची आई शोभना समर्थ यांनीच केल होतं. त्यांनतर त्यांनी ‘नगीना’ हा चित्रपट केला होता. या चित्रपटाचा प्रीमियर पाहण्यासाठी त्या पोहचल्या होत्या. मात्र त्यांना वॉचमनने गेटवरचं रोखलं होतं. कारण या चित्रपटाला सेन्सॉरकडून ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं होतं. हा चित्रपट एक भयपट होता. आणि प्रीमियर पाहण्यासाठी पोहचलेल्या नूतन या केवळ 15 वर्षांच्या होत्या. आणि त्यांना आपल्या कमी वयामुळे आत जाता आलं नाही. म्हणजे चित्रपटाच्या अभिनेत्रीलाच प्रीमियर पाहता आला नव्हता.

(हे वाचा:अँजेलिना प्रेमाच्या शोधात; 3 लग्न 8 बॉयफ्रेंड, मात्र तरी विश्वसुंदरी पडली एकटी   )

अभिनेत्री नूतन या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या बहीणसुद्धा आहेत. नूतन यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तब्बल 6 फिल्मेफेअर पुरस्कार आपल्या नावावर केले होते. आणि त्यानंतर त्यांची भाची काजोलनेचं त्यांची बरोबरी करत 6 फिल्मेफेअर पटकावले आहेत.

First published:
top videos

    Tags: Bollywood actress, Entertainment