मुंबई, 10 जून- ‘द फॅमिली मॅन’(The Family Man) च्या यशानंतर आलेला ‘फॅमिली मॅन 2’ (Family Man 2) हा सिझनसुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. अभिनेता मनोज वाजपेयी, प्रियामणी, समंथा अक्खीनेनी या कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने मोठं यश खेचून आणलं आहे. या दोन्ही सिझनच्या रोमांचक अनुभवानंतर प्रेक्षकांना आत्ता तिसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. मध्यंतरी तिसऱ्या भागाबद्दल संकेत मिळाले होते. मात्र आत्ता स्वतः मनोज वाजपेयी यांनी याबदल माहिती दिली असल्याचं समजत.
View this post on Instagram
‘बॉलिवूड बबल्स’ ला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेता मनोज वाजपेयी यांनी सांगितलं आहे, ‘कथा तयार आहे. लॉकडाऊननंतर वेबसिरीजच्या तिसऱ्या भागावर काम सुरु होईल. त्याचंबरोबर अमेझॉनकडून ग्रीन सिग्नल मिळताच कथेला पटकथेत बदलण्याचं काम सुरु करण्यात येईल. आणि सर्वकाही ठीक राहिलं, तर तिसऱ्या भागाचं शुटींग करण्यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागेल’.
(हे वाचा:सुशांत कोणत्याचं ऑडिशनमध्ये झाला नव्हता अपयशी; मुकेश छाबरांचा VIDEO होतोय VIRAL )
असं म्हटलं जात आहे, तिसऱ्या सिझनमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी चीनकडून येणाऱ्या समस्यांशी लढा देताना दिसणार आहेत. ‘द फॅमिली मॅन’ मध्ये दिल्ली आणि जम्मू काश्मीरची समस्या मांडण्यात आली होती. तर ‘फॅमिली मॅन 2’ मध्ये तमिळमधील समस्यांशी लढा देताना दाखवण्यात आलं होतं. तसेच या भागात दाक्षिणात्य सुपरस्टार समंथा अक्खीनेनीला सुसाईड बॉम्बर दाखविण्यात आल्यामुळे दक्षिणात्य चाहते नाराज झाले होते.
(हे वाचा:VIDEO:'बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील', नऊवारी साडीत किशोरी शहाणेंचा धम्माल डान्स )
‘फॅमिली मॅन 2’ या वेबसिरीजमध्ये देशाच्या गुप्तहेर विभागात काम करणाऱ्या श्रीकांत या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता मनोज वाजपेयी सध्या चांगलेच चर्चेत आहेत. प्रत्येक क्षणाला आपला जीव धोक्यात घालणारी नोकरी आणि आपल्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होणारी कसरत मनोज वाजपेयी यांनी उत्मम साकारली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Manoj Bajpayee