बिग बींचा ‘Chehre’ कोरोनामुळं अडचणीत; वर्षभरात तिसऱ्यांदा चित्रपट गेला लांबणीवर

बिग बींचा ‘Chehre’ कोरोनामुळं अडचणीत; वर्षभरात तिसऱ्यांदा चित्रपट गेला लांबणीवर

बिग बींच्या चाहत्यांसाठी दुखद बातमी म्हणजे आता या तारखेला देखील चित्रपट प्रदर्शित होणार नाही. निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख वाढत्या कोरोनामुळं पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.

  • Share this:

मुंबई 31 मार्च: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा ‘चेहरे’ (Chehre) हा चित्रपट गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. खरं तर हा बिग बजेट चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळं प्रदर्शन लांबणीवर गेलं. (Coronavirus) त्यानंतर लॉकडाउन उठल्यामुळं येत्या 9 एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होईल अशी घोषणा निर्मात्यांनी केली होती. परंतु बिग बींच्या चाहत्यांसाठी दुखद बातमी म्हणजे आता या तारखेला देखील चित्रपट प्रदर्शित होणार नाही. निर्मात्यांनी प्रदर्शनाचीतारीख वाढत्या कोरोनामुळं पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि सिनेमागृहांसाठी जारी करण्यात आलेली नवी नियमावली यामुळं निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. “आता 9 एप्रिलला आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करू शकत नाही आणि पुढच्या सूचनापर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आभारी आहोत. जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा, आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये ‘चेहरे’ भेटीस आणू. सर्व लवकरच थिएटरमध्ये भेटू. आपला चेहरा मास्कने झाका आणि सॅनिटायझर वापरण्यास विसरू नका.” अशा आशयाचं ट्विट करुन इमरान हाशमीनं ही दुखद बातमी प्रेक्षकांना दिली. गेल्या दीड वर्षात हा चित्रपट तिसऱ्यांदा लांबणीवर गेला आहे. त्यामुळं प्रेक्षक नव्या तारखेची आतुरतेने वाट पाहात आहेत.

अवश्य पाहा - माधुरी दीक्षितच्या कार्यक्रमात कोरोनाचा विस्फोट; 18 जणांना झाली लागण 

24 तासांत 5 हजार 185 नव्या रुग्णांची भर

पालिकेकडून जारी करण्यात आलेल्या आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत दिवसभरात 5 हजार 185 नवे करोनाबाधित सापडले असून मुंबईतल्या एकूण बाधितांची संख्या आता 3 लाख 74 हजार 611 इतकी झाली आहे. त्यापैकी 30 हजार 760 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या मुंबईत आहेत. करोनाचं संकट सुरू झाल्यापासून आजपर्यंत झालेली ही सर्वात मोठी रुग्णवाढ ठरली आहे. गेल्या काही दिवसांत मुंबईत सातत्याने 3 हजारांच्या वर रुग्ण सापडत असताना आज अचानक ही रुग्णवाढ 5 हजारांच्या वर गेली आहे.

Published by: Mandar Gurav
First published: March 31, 2021, 10:28 AM IST

ताज्या बातम्या