मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कसं केलं जातं तरुणींचं शोषण?; ईशा अग्रवालनं केली बॉलिवूडची पोलखोल

कसं केलं जातं तरुणींचं शोषण?; ईशा अग्रवालनं केली बॉलिवूडची पोलखोल

'मिस ब्यूटी टॉप ऑफ द वर्ल्ड2019' चा किताब जिंकणारी ईशा अग्रवाल चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कास्टिंग काउचची (Casting Couch)शिकार झाली आहे.

'मिस ब्यूटी टॉप ऑफ द वर्ल्ड2019' चा किताब जिंकणारी ईशा अग्रवाल चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कास्टिंग काउचची (Casting Couch)शिकार झाली आहे.

'मिस ब्यूटी टॉप ऑफ द वर्ल्ड2019' चा किताब जिंकणारी ईशा अग्रवाल चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कास्टिंग काउचची (Casting Couch)शिकार झाली आहे.

    मुंबई 1 मे: जॅकी श्रॉफ आणि संजय कपूर यांच्यासोबत' कहीं हैं मेरा प्यार' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री ईशा अग्रवाल (Eesha Agarwal) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिने बॉलिवूडमध्ये मोजकेच चित्रपट केलेत. मात्र, साऊथच्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका करून तिने लोकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलंय.'मिस ब्यूटी टॉप ऑफ द वर्ल्ड2019' चा किताब जिंकणारी ईशा अग्रवाल चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी कास्टिंग काउचची (Casting Couch)शिकार झाली आहे. नुकताच तिने तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला आहे.

    आतापर्यंत अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काउचचा खुलासा केलाय. मात्र, ते समोर येऊन सांगायला हिंमत लागते हेही तेवढंच खरं. अभिनेत्री ईशाअग्रवालनेही (Eesha Agarwal)ही हिंमत दाखवलीए. तिने 'स्पॉटबॉय'ला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं. "महाराष्ट्रातल्या लातूर सारख्या छोट्याशा शहरातल्या माझ्या सारख्या तरुणीला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मलाही मुंबईत येऊ देण्यासाठी माझ्या आई-वडिलांची समजूत काढावी लागली. त्यांनी विश्वास ठेवला आणि माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेच मी मुंबईत पोहोचले आणि ऑडिशन द्यायला लागले,असं ईशा अग्रवालनं सांगितलं.

    ‘असा मेसेज आल्यास व्हा अलर्ट’; आर. माधवन यानं देशवासीयांना केलं सावध

    "मुंबईत आल्यानंतर अगदी काही दिवसांतच मला कळलं ही, मी जो मार्ग निवडलाय तो सोपा नाहीए. मी जेव्हा मुंबईत नवीन होते, तेव्हा एका कास्टिंग पर्सनने मला त्याच्या ऑफिसमध्ये बोलावलं होतं. मी माझ्या बहिणीसोबत तिथं पोहोचले. त्याने सांगितलं की त्याने आतापर्यंत अनेक मोठ्या कलाकारांना कास्ट केलंय. मलाही एक चांगला प्रोजेक्ट देईल, असं त्याने आश्वासन दिलं. यावेळी बोलता बोलता अचानक त्याने मला माझे कपडे काढण्यास सांगितलं आणि म्हटला की, त्याला माझं शरीर बघायचंय. मी काही बोलायच्या आधीच तो म्हटला की माझं शरीर पाहिल्यानंतर मी या रोलसाठी फीट आहे, की नाही याबद्दल तो सांगेल. या प्रकाराचा मला प्रचंड राग आला. मी त्याच्या ऑफरला नकार दिला आणि बहिणीसोबत निघून गेले. त्यानंतर बरेच दिवस तो मला मेसेज करत होता. मात्र, मी त्याचा फोन नंबर ब्लॉक करून टाकला."

    ईशाने या मुलाखतीत आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांना सल्लाही दिला. ती म्हणाली, "तुम्हाला इथं बरीच लोकं भेटतील जी सांगतील, की ते खूप मोठ्या कास्टिंग कंपनीचे आहेत. मात्र, तसं नसतं त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहा आणि तुमच्यासाठी योग्य असलेल्या गोष्टींची निवड करा. तुमच्यात टॅलेंट असेल, क्षमता असेल तर कोणत्याही तडजोडी शिवाय तुम्हाला यश मिळेल," असंही ईशा म्हणाली.

    First published:
    top videos

      Tags: Bollywood, Casting couch, Entertainment