मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /फॅशनपेक्षा Comfort Zone महत्त्वाचा! देसी गर्लने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops

फॅशनपेक्षा Comfort Zone महत्त्वाचा! देसी गर्लने चित्रपट प्रमोशनवेळी घातले FlipFlops

Work From Home करताना सर्वच जण कोणतेही फॉर्मल कपडे-चपला न परिधान करता सोपे आणि आरामदायक गोष्टी वापरत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील अशाच काहीशा अंदाजात या काळात पाहायला मिळाले.

Work From Home करताना सर्वच जण कोणतेही फॉर्मल कपडे-चपला न परिधान करता सोपे आणि आरामदायक गोष्टी वापरत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील अशाच काहीशा अंदाजात या काळात पाहायला मिळाले.

Work From Home करताना सर्वच जण कोणतेही फॉर्मल कपडे-चपला न परिधान करता सोपे आणि आरामदायक गोष्टी वापरत आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील अशाच काहीशा अंदाजात या काळात पाहायला मिळाले.

मुंबई, 15 जानेवारी: कोरोनाच्या (Covid 19)  काळात अनेकजण अद्यापही घरून काम करत आहेत. यामुळे काही गोष्टींमध्ये फायदा देखील होत आहे. अनेकदा आपण घरून काम करताना नाईट ड्रेसवर किंवा शॉर्ट कपड्यांमध्ये देखील बसून काम करू शकतो. यामध्ये सामान्य माणसांबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आघाडीवर आहेत. नुकतंच प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) हिने एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तिने फ्लिप फ्लॉप्स (Flip Flops) घातल्या आहेत. ही गोष्ट नेटिझन्सनी नोटीस केली आहे.

प्रियांकाची आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झूम या व्हिडीओ अ‍ॅपवर व्हर्च्युअल मिटिंग होती. यामध्ये तिने असे चप्पल घातले होते. या व्हिडीओत तिने फॉर्मल शर्ट आणि पँट घातली आहे पण त्यावर डिझायनर बुट न घालता तिनेे फ्लिप फ्लॉप घातले आहेत. या व्हिडीओमध्ये तिने 'Business on the top and in the bottom, well you know' असे म्हटले आहे.

प्रियांका सध्या व्हाईट टायगर (White Tiger) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात तिने पिंकी मॅडम ही भूमिका साकारली असून निर्माती म्हणून देखील या चित्रपटामधे तिचा भाग आहे. नुकतेच तिने लंडनमध्ये टेक्स्ट फॉर यू (Text For You) चे शूटिंग पूर्ण केलं असून रुसो ब्रदर्सच्या  सिटाडेल आणि द मॅट्रिक्स 4 मध्ये देखील ती दिसणार आहे. टेक्स्ट फॉर यू (Text For You) मध्ये तिच्याबरोबर मिंडी कलिंग(Mindy Kaling) आणि डॅन गुर (Dan Goor) हे देखील दिसणार आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रासोबत केलेल्या मुलाखतीदरम्यान तिला किती मुलं हवीत, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी तिने व्हाईट टायगर या प्रमोशनसाठी आल्याने त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यास सांगितले. याचबरोबर मुलांच्या प्रश्नावर  प्रियांका चोप्राने दिलेल्या उत्तराने सर्वचजण चाट झाले. 38 वर्षीय प्रियांका चोप्रा म्हणाली की, तिला 11 मुलं हवी आहेत आणि जोर जोराने हसू लागली. पुढे म्हणाली की, (Priyanka Chopra wants her own Cricket Team) मला क्रिकेट टीम बनवायची आहे. ज्यामध्ये 11 जणं असतील.  11 मुलांची इच्छा व्यक्त केल्यानंतर ती काहीवेळ थांबली आणि म्हणाली होती की 11 मुलं थोडी जास्त होती. कदाचित मी याबाबत नक्की सांगू शकत नाही.

First published:
top videos