मुंबई, 8 ऑगस्ट : अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्यासारखंच तिचा भाऊ राजीव सेनही (Rajeev Sen) कायम चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून राजीव त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. राजीव आणि त्याची पत्नी चारू असोपा यांच्यामध्ये सध्या वाद-विवाद सुरु असून ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोपही केले होते. राजीव आणि असोपानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला असतानाच आता आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर येत आहे. राजीव सेन आणि असोपा चारु यांच्या घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या येत असतानाच आता राजीवने त्याच्या इंस्टाग्रामवर पत्नी चारू असोपासोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे. या फोटोमध्ये राजीव आणि चारू हसताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना राजीवने कॅप्शनमध्ये गुलाबाच्या फुलाचा इमोजीही शेअर केला आहे. राजीवनं शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांना आश्चर्यांचा धक्काच बसला आहे.
राजीव-चारूचा हा फोटो एकत्र पाहिल्यानंतर अनेकांना त्यांनी पॅचअप केलं आहे असं वाटत आहे. दोघांमध्येही सगळं ठीक झालं असल्याचं दिसत आहे. यापूर्वी राजीवने आजारपणात मुलगी जियानाची चांगली काळजी घेतल्याबद्दल चारूचे कौतुकही केले होते. तेव्हापासून त्याच्या पॅचअपच्या बातम्या वेगाने समोर येत आहेत. हेही वाचा - Kareena Kapoor: ‘लाल सिंह चड्ढा’च्या प्रमोशनसाठी पतौडी बेगमचा ट्रेडिशनल लुक, करीनावर चाहते फिदा दरम्यान, राजीव सेन आणि असोपा चारुनं 2019 मध्ये दोघांनी लग्न केले. राजीव आणि चारू यांना जियाना नावाची मुलगी देखील आहे. चारूने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुलीला जन्म दिला. आता दोघांमधील नातं काय वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.