उर्मिला उत्तम अभिनेत्री आहेच तसेच ती सक्सेसफुल यूट्युबर, उत्तम मराठी काँटेंट क्रिएटर आहे. आणि त्याहून भारी म्हणजे ती अथांगची सुंदर, प्रेमळ आई देखील आहे. अथांगच्या जन्मापासूनच उर्मिला त्याच्या सगळ्या गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत आली आहे. हेही वाचा - Tujhech Mi Geet Gaat Ahe: मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री उर्मिला कोठारेनं का घेतली मालिकेमधून एक्झिट? उर्मिला आणि तिचा नवरा सुकीर्त दोघेही त्यांच्या बाळाला फार उत्तमरित्या सांभाळत असतात. सुकीर्तही उर्मिलाला सगळ्या गोष्टीत सपोर्ट आणि मदत करत असतो. उर्मिलाने काही दिवसांपूर्वी सुकीर्तसाठी खास पोस्ट शेअर केली होती. ज्यात सुकीर्त अथांगला पोटाशी बांधून वॉकला घेऊन जाताना दिसत होता. एक नवरा, मित्र आणि आता बाबा म्हणून सुकीर्त सगळ्या जबाबदाऱ्या न लाजता पार पाडतो याच उर्मिलानं कौतुक केलं होतं. उर्मिला यूट्यूबर होण्याआधी अभिनेत्री होती. स्टार प्रवाहवरील 'दुहेरी' मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. तसेच झी युवाच्या 'बन मस्का' मालिकेतही तिनं काम केलं आहे. 'सनई चौघडे' या मराठी सिनेमातही उर्मिला अभिनय केलाय. मराठी तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील उर्मिला हा सर्वांच्या ओळखीचा चेहरा आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.