रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नका, तिची सुटका करा; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने केली मागणी

रिया चक्रवर्तीला त्रास देऊ नका, तिची सुटका करा; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याने केली मागणी

रिया चक्रवर्तीला NCBने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. रिया ही सुशांतला ड्रग्ज पुरवित होती असं आढळून आल्याने कारवाई करत तिला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली होती.

  • Share this:

कोलकाता 04 ऑक्टोबर: अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Actor Sushant Singh Rajput) मैत्रिण रिया चक्रवर्तीला आता त्रास देऊ नये तिची तातडीने सुटका करावी अशी मागणी लोकसभेतले (Lok Sabha) कांग्रेसचे नेते (Congress Leader) अधीर रंजन चौधरी यांनी केली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS)ने हत्येची शक्यता फेटाळून लावत सुशांतने आत्महत्याच केली असं जाहीर केल्यानंतर तिची सुटका करायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

रिया चक्रवर्तीला NCBने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. रिया ही सुशांतला ड्रग्ज पुरवित होती असं आढळून आल्याने कारवाई करत तिला आणि तिच्या भावाला अटक करण्यात आली होती. रिया ही राजकारणाचा बळी (Political conspiracy)  ठरल्याची टीकाही त्यांनी केली. भाजपचे लोक आता एम्सच्या फॉरेन्सिक टीमवर (Forensic Team of AIIMS)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबत आता दिल्लीतील एम्स हॉस्पिटलने मोठा खुलासा केला आहे. सुशांतने आत्महत्याच केली आहे, असं शिक्कामोर्तब एम्सने केले आहे. त्यानंतर आता अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Big Boss14 च्या सेटवर अवतरली 'राधे मां' आणि काय घडलं पाहा VIDEO

'सत्य कोणत्याही परिस्थितीमध्ये बदललं जाऊ शकत नाही. रिया चक्रवर्तीच्या वतीने आम्ही कायम सांगत आलोय. पण काही माध्यमांमध्ये रियाबाबतच्या बातम्या विशिष्ट हेतूने पेरल्या जात आहेत. मात्र, आमचा सत्यावर विश्वास आहे. सत्यमेव जयते, अशी प्रतिक्रिया , रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.

PHOTOS : बिग बॉस- 14 मध्ये कोणाचे चालतील नियम? या विजेत्या अभिनेत्रीकडे जबाबदारी

दरम्यान, सुशांत प्रकरणात  दिल्लीतील​ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) च्या डॉक्टरांच्या टीमने सीबीआयकडे आपला अहवाल सुपूर्द केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  AIIMS च्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी, या थेअरीला नकार दिला आहे. सुशांतची हत्या झाली नाही, असं या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 4, 2020, 8:48 PM IST

ताज्या बातम्या