Sacred Games च्या अभिनेत्रीने सांगितला 'कास्टिंग काउच'चा धक्कादायक अनुभव

क्लीव्हेज कसं दिसतं ते पाहायचंय, असं एका दिग्दर्शकाने या अभिनेत्रीला सांगितलं होतं. एक- दोन नव्हे पाच वेळा तिला कास्टिंग काउचचे कसे भयानक अनुभव आले, हे तिनेच आता सांगितलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2019 08:44 PM IST

Sacred Games च्या अभिनेत्रीने सांगितला 'कास्टिंग काउच'चा धक्कादायक अनुभव

मुंबई, 23 सप्टेंबर : हिंदी मालिका, चित्रपट आणि सॅक्रेड गेमसारखी गाजलेली वेबसीरिज यामधून चमकलेल्या एका बॉलिवूड अभिनेत्रीने इंडस्ट्रीमधल्या कास्टिंग काउचविषय खळबळजनक सत्य सांगितलं आहे. अभिनेत्री सुरवीन चावलाने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत एकदा नाही पाच वेळा कास्टिंग काउचचा वाईट अनुभव आला असं म्हटलं आहे. एका दिग्दर्शकाला माझं क्लिव्हेज कसं दिसतं बघायचं होतं, तर दुसरा माझं शरीर बघू इच्छित होता. तुमच्या शरीराचं इंचन् इंच कसं दिसतं मला जाणून घ्यायचं, असं मला एका दाक्षिणात्य दिग्दर्शक म्हणाल्याचा भीषण अनुभव सुरवीन चावलानं सांगितला.

सुरवीनने सेक्रेड गेम्समध्ये काम केलं आहे. गणेश गायतोंडेच्या तोंडी सतत नाव असलेल्या जोजोच्या भूमिकेत सुरवीनने कमाल केली. या वेबसीरिजमुळे सुरवीनच्या लोकप्रियतेत भर पडली. सुरवीनने पिंक व्हिला या वेबसाइटटला दिलेल्या मुलाखतीत आपल्याबरोबर घडलेले हे प्रसंग कथन केले.

सुरवीन चावलाने सेक्रेड गेम्स 2 मध्येही काम केलं.

सुरवीन चावलाने सेक्रेड गेम्स 2 मध्येही काम केलं.

दाक्षिणात्य सिनेमात काम करण्यासाठी गेलेल्या सुरवीनला तिथल्या एका दिग्दर्शकाने अशी घाणेरडी अपेक्षा बोलून दाखवली.

हे पाहा - आमिरच्या लेकीने शेअर केला क्लबमधला बोल्ड फोटो, सोशल मीडियावर होताय तुफान VIRAL

Loading...

त्यानंतर आपण ती फिल्म केली नाही, असं सुरवीन सांगते. दुसऱ्या एका दिग्दर्शकाने थाइज दाखवण्याचा आग्रह केला होता. स्क्रीनवर तुमच्या थाइज कशा दिसतात हे पाहायचंय असं त्याने ऐकवलं होतं, असं सुरवीन सांगते. साउथ फिल्ममेकर्सकडून 3 वेळा आणि एकूण 5 वेळा आपल्याला असा भयानक अनुभव आल्याचं तिने सांगितलं.

हे वाचा -पतीसाठी ओक्साबोक्शी रडली राखी सावंत; म्हणाली तुम्हाला माझी जराशीही दया येत नाही?

एका दिग्दर्शकाच्या पीएचा फोन मला आला. सर तुम्हाला समजून

दाक्षिणात्या चित्रपटांचा एक दिग्दर्शक मला म्हणाला होता, 'सर तुम्हाला जवळून जाणून घेऊ इच्छितात.' सुरवीन सांगते. अर्थातच तिने याही चित्रपटाला नकार दिला. कास्टिंग काउचचा अनुभव अनेक प्रस्थापित अभिनेत्रींनाही कसा आला आहे, या भीषण वास्तवाची जाणीव सुरवीनच्या या मुलाखतीमुळे झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2019 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...