जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर मानसोपचार विषयात एम.डी.ची पदवी घेऊन ते मानसोपचाराचे प्राध्यापक झाले. मराठी रंगभूमीवर येण्यापूर्वी त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजी आणि सायकोफार्माकोलॉजी या क्षेत्रात काम केले.
१९७५ मध्ये श्याम बेनेगल यांच्या निशांत या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आजतागायत त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटातून भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
मराठीमध्ये विनोदाचे नवे पर्व सुरू करणारा गुणी अभिनेता म्हणजे निलेश साबळे. चला हवा येऊ द्या या प्रसिध्द कार्यक्रमाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असलेल्या निलेशने वैद्यकीय शिक्षण घेतलेले आहे.
विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून बहुरंगी भूमिका साकारणारे अभिनेते गिरीश ओक हेदेखील डॉक्टर आहेत. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी वैद्यकशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतुन अभिनयाची सुरुवात केलेला हा गुणी अभिनेता आशिष गोखले. 'तारा फ्रॉम सातारा' या टीव्ही मालिकेत काम करणारा आशिष गोखले खऱ्या आयुष्यात डॉक्टर आहे.
त्याने M.B.B.S चे शिक्षण पूर्ण केले आणि काही दिवस डॉक्टरकीचा सराव देखील केला.मराठी चित्रपट मोगरा फुलाला मध्येही त्याने काम केले आहे.