सलमान खाननं 5 हजार लोकांना केलं अन्न वाटप; युवा सेनेनं मानले भाईजानचे आभार
प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानं गरीबांना मदतीचा हात पुढे केला.
|
1/ 5
महाराष्ट्राला कोरोनाचा मोठा तडाखा बसला आहे. वाढत्या संक्रमणामुळं लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मात्र या प्रतिकूल परिस्थितीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खान यानं गरीबांना मदतीचा हात पुढे केला.
2/ 5
सलमानननं रविवारी राज्यातील तब्बल 5000 लोकांना अन्न आणि पाण्याचं वाटप केलं.
3/ 5
युवा सेनेचे सदस्य राहुल एन कानल यांनी सलमानचे अन्न वाटप करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत.
4/ 5
भाईजाननं केलेल्या या मदतीसाठी त्याची सर्वत्र स्तुती केली जाते. दरम्यान त्यानं अशीच लोकांची मदत करावी अशीही विनंती त्याला केली जात आहे.
5/ 5
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 67,160 नवे रुग्ण आढळले असून, 676 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 6 लाख 94 हजार रुग्ण हे उपचाराधीन आहेत.