मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Diwali 2022: 'आता हाच आमचा संसार'; सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली दिवाळी

Diwali 2022: 'आता हाच आमचा संसार'; सोनाली कुलकर्णीने दुबईत साजरी केली दिवाळी

सोनाली कुलकर्णी

सोनाली कुलकर्णी

सोनाली यावर्षी आपला पती कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. आणि अगदी मराठमोळ्या पद्धतीने दुबईत दिवाळीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने झक्कास फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई, 25 ऑक्टोबर-   मराठमोळी अप्सरा अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. देशात असो किंवा देशाबाहेर असणारे भारतीय असो सर्वजण मोठ्या उत्साहात हा दीपोत्सव साजरा करत आहेत. यामध्ये सोनाली कुलकर्णीसुद्धा मागे नाहीय. मात्र यंदाची दिवाळी सोनालीसाठी फारच वेगळी आणि खास आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण यंदा सोनाली पहिल्यांदाच देशाबाहेर दिवाळी साजरी करत आहे. सोनाली यावर्षी आपला पती कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. आणि अगदी मराठमोळ्या पद्धतीने दुबईत दिवाळीचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने झक्कास फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शनही दिलं आहे.

सध्या देशभरात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. घराची सजावट करण्यापासून, कपडे खरेदी करण्यापर्यंत आणि फराळ बनवण्यापासून रांगोळी काढण्यापर्यंत लोकांची सगळी लगबग दिसून येत होती. यामध्ये मराठी आणि बॉलिवूड सेलिब्रेटीही मागे नाहीत. कोरोना काळात सर्वच सणांवर निर्बंध आली होती. परंतु यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा सर्वच सण मोठ्या उत्सहात साजरे केले जात आहेत. दिवाळी हा आपल्या देशातील सर्वात मोठा सण समजला जातो. या सणाची प्रत्येक व्यक्तीला मोठी आतुरता असते. कालपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे. काल सर्वांनी आपापल्या घरी, कामाच्या ठिकाणी लक्ष्मी पूजन करत दिवाळीची भव्यदिव्य सुरुवात केली आहे.

(हे वाचा: Diwali 2022: बांधणी पैठणी, पेशवाई दागिन्यांत खुललं सुखदाचं सौंदर्य; अभिजितसोबत नव्या घरात साजरी केली पहिली दिवाळी)

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा यंदाच्या दिवाळीसाठी फारच उत्सुक आहे. कारण ही दिवाळी तिच्यासाठी फारच वेगळी आणि खास आहे. अभिनेत्री यंदा देशाबाहेर दिवाळी साजरी करत आहे. अर्थातच सोनाली कुलकर्णी सध्या पती कुणाल बेनोडेकरसोबत दुबईमध्ये आहे. सोनाली यंदा दुबईत दिवाळी साजरी करत आहे. ही तिची दुबईत पहिलीच दिवाळी आहे. देशाबाहेर असूनही सोनालीने दिवाळीच्या तयारीत कोणतीच कसर सोडली नाहीय. रांगोळी पासून घर सजावटी पर्यंत अभिनेत्री सर्व कामे अगदी चोख पार पाडली आहेत. सोनाली आणि पती कुणालने मिळून दिवाळीनिमित्त ही सुंदर सजावट केली आहे. सोनालीने या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाली कुलकर्णी पोस्ट-

सोनाली कुलकर्णीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने एक टीपसुद्धा लिहली आहे. यंदा पहिल्यांदाच दिवाळी आमच्या घरी साजरी करत आहोत…माहेर नाही सासर नाही आमचं घरपूजेची सगळी तयारी, पूजा मांडणे, करणे,दिवाळी ची सजावट, आपल्या comfort zone च्या बाहेर, अगदी दोन दिवसात,दोन माणसांत... आता हाच आमचा संसार''.

सोनाली कुलकर्णी लग्न-

सोनाली कुलकर्णीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. कुणाल हा कामानिमित्त दुबईत स्थायिक झाला आहे. सोनाली आणि कुणालने लॉकडाऊनमध्ये लग्न केलं होतं. यावेळी फक्त या दोघांनी साधेपणाने लग्नगाठ बांधली होती. यावेळी दोघांचेही कुटुंबीय किंवा मित्र कोणीच हजर राहू शकले नव्हते. त्यामुळेच काही महिन्यांपूर्वी सोनाली आणि कुणालने पुन्हा कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थित थाटामाटात लग्न पार पाडलं. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

First published:
top videos

    Tags: Diwali, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Sonalee Kulkarni