नुसरत जहाँसाठी ही दिवाळी खूप खास आहे. ती मुलगा ईशान आणि तिचा प्रियकर अभिनेता यश दासगुप्तासोबत पहिल्यांदाच दिवाळी साजरी करत आहे. नुसरतने या उत्सवादरम्यान कॅमेऱ्यात कैद झालेल्या फोटोंची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. या फोटोंमध्ये तिनं साजशृंगार केलं आहे. नुसरतनं तिच्या कपाळावर लाल टीका आणि सिंदूर लावलेलं पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
नुसरत जहाँने तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने जांभळ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे, ज्यामध्ये गोल्डन एम्ब्रॉयडरी केली आहे. फोटोंमध्ये ती पणतीसोबत पोज देताना दिसत आहे.
या फोटोंसोबतच तिने तिच्या इंस्टाग्रामवर दोन खास फोटो शेअर केले आहेत. त्यांनी त्यांचा मुलगा इशान दास गुप्ताची पहिली झलक दाखवली आहे. या फोटोमध्ये नुसरत इशानला तिच्या मांडीवर घेऊन बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये सिंदूर पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत आहेत. फोटोसोबत तिनं लिहिले आहे, दिवाळीच्या शुभेच्छा.
तिने मुलगा ईशानच्या फोटोसह आणखी एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा प्रियकर यश दासगुप्ताच्या डोळ्यात डोळे घालून बघत आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले आहे, आमच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा.
नुसरतचे हे फोटो पाहून सोशल मीडियावर यूजर्स तिला पुन्हा एकदा ट्रोल करत आहेत. मुस्लीम असल्याने सिंदूर कसा लावायचा, असं लोक म्हणत आहेत. दुसर्याने लिहिले - तुम्हाला पुन्हा फतवा काढायचा आहे का?
नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी अद्याप त्यांचे नातं सार्वजनिक केलं नाही. परंतु फोटोंच्यामाध्यमातून ते एकत्र झाल्याचं वारंवार सूचित करत आहेत.