• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'Sooryavanshi' झाला Leak! रोहित शेट्टीला बसू शकतो कोट्यवधींचा फटका

रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'Sooryavanshi' झाला Leak! रोहित शेट्टीला बसू शकतो कोट्यवधींचा फटका

Ranveer Singh

Ranveer Singh

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) 'सूर्यवंशी' (Sooeyavanshi) चित्रपट कोरोनामुळे बराच काळ रिलीजसाठी अडकला होता. या दिवाळीत रोहित शेट्टीने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली. 5 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी 'सूर्यवंशी' हा चित्रपट भारतात सुमारे 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे.

 • Share this:
  मुंबई,5 नोव्हेंबर- अक्षय कुमार  (Akshay Kumar)  आणि कतरिना कैफचा  (Katrina Kaif)  'सूर्यवंशी'  (Sooeyavanshi)  चित्रपट कोरोनामुळे बराच काळ रिलीजसाठी अडकला होता. या दिवाळीत रोहित शेट्टीने चाहत्यांची प्रतीक्षा संपवली. 5 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशी 'सूर्यवंशी' हा चित्रपट भारतात सुमारे 4000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शित होताच रोहित शेट्टीचं टेन्शन आणखी वाढलं आहे. कारण हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याची बातमी समोर आली आहे.
  'सूर्यवंशी' हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा (पोलीस केंद्रित) तिसरा चित्रपट आहे. कोरोना नंतर जेव्हा निर्माते त्यांचे चित्रपट OTT वर प्रदर्शित करत होते, तेव्हा रोहित शेट्टीनं ठरवलं होतं की ते हा चित्रपट फक्त आणि फक्त मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करतील. चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर या दिवाळीत लोकांसाठी मनोरंजनाचा मोठा धमाका त्यांनी केला आहे. मात्र आता अनेक वेबसाइटवर सूर्यवंशी लीक झाल्याची बातमी येत आहे. कोणकोणत्या वेबसाईट्स आहे समावेश- ज्या वेबसाइट्सवर हा सिनेमा लीक झाला आहे. त्यामध्ये तमिळ रॉकर्सच्या नावाचाही समावेश आहे. ही साइट या प्रकरणांमध्ये सर्वात वर आहे. याशिवाय हा चित्रपट टेलिग्रामच्या अनेक चॅनेलवर आणि Filmy Zilla नावाच्या वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. हा चित्रपट सर्व साइट्सवर एचडी प्रिंटमध्ये डाउनलोड केला जाऊ शकतो. चित्रपट लीक झाल्याची बातमी आल्यापासून निर्माते चिंतेत आहेत. कारण चित्रपट लीक झाल्यास निर्मात्यांना करोडोंचा फटका बसू शकतो. रोहित शेट्टीचा हा मल्टीस्टारर चित्रपट बनवण्यासाठी 225 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. (हे वाचा:अनिल कपूर यांच्या 'Diwali Party'मध्ये अर्जुनच्या हातात हात घालून मलायकानं केली..) सूर्यवंशी हा रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी सिंघम आणि सिम्बा या चित्रपटांचा समावेश आहे. अक्षय आणि कतरिना सूर्यवंशीच्या मुख्य कलाकारांमध्ये आहेत, तसेच अजय देवगण आणि रणवीर सिंग हे देखील या चित्रपटाचा विशेष भाग म्हणून आहेत. चित्रपटातील गाणी अप्रतिम आहेत. या चित्रपटात अक्षय आणि कतरिना 11 वर्षांनंतर एकत्र रोमान्स करताना दिसत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: