मुंबई 20 मे: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौते चक्रीवादळानं (Cyclone) केरळ, तामिळनाडू, गोवा, महाराष्ट्र आणि गुजराजमध्ये थैमान घातलं. या वादळामुळं काही तासांत होत्याचं नव्हतं केलं. (Tauktae cyclone) कोरोनामुळं आधीच त्रस्त असलेले लोक या वादळामुळं उध्वस्त झाले. लोकांची उरली सुरली हिंमत देखील तुटली. पुन्हा एकदा पायांवर उभी राहण्याचा प्रयत्न करणारी सिनेसृष्टी पुन्हा एकदा खाली बसली असं दु:ख प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) हिनं व्यक्त केलं.
दिव्यानं नुकतीच हिंदुस्तान टाईम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिनं तौते चक्रीवादळावर भाष्य केलं. ती म्हणाली, “डोळ्यांसमोर मी माझ्या लोकांना उध्वस्त होताना पाहात होते. जी झाडं मी दररोज मायेनं कुरवाळायची, ज्यांच्या सावलीत नैराश्य दुर करायची. ती झाडं काही तासांत मी मोडताना पाहिली. कोरोनामुळं आधीच होरपळेला सर्वसामान्य माणूस आता आणखी तुटला आहे. कोरोनाशी संघर्ष करुन त्यानं जी हिंमत मिळवली होती ती या वादळामुळं त्यानं गमावली. काही तासांत त्याचा संसार उध्वस्त झाला. अन् मी हे सर्व केवळ पाहात होते. कोणाचीही मदत करु शकले नाही. ही असाहयाता मला स्वस्थ बसू देत नाही आहे. यामुळं मला प्रंचड वेदना होत आहेत. असं दु:ख दिव्या दत्तानं व्यक्त केलं.”
..अन् सेटच गेला उडून; चक्रीवादळामुळं सलमान खानचं कोट्यवधींचं नुकसान
वादळामुळं राज्यातील 1 हजार 784 घरांची पडझड झाली. तर अनेक घरं पूर्णपणे नेस्तनाबूत झाली. प्रशासनानं 5 हजार 240 कुटुंबांतील 8 हजार 383 नागरिकांना तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित केले आहे. जिल्ह्य़ातील 135 उच्च दाब विद्युत वाहिनीचे खांब, तर 418 लघुदाब विद्युत वाहिनीचे खांब पडले. यामुळे अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील वीजपुरवठा खंडित झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Cyclone, Entertainment