मुंबई 24 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली प्रतिक्रिया देते. यावेळी तिनं दिशा रवी प्रकरणावर ट्विट केलं. हे ट्विट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसृत केलेल्या ‘टूलकिट’प्रकरणी (Disha Ravi Bail) पोलिसांनी सादर केलेले पुरावे त्रोटक आणि अस्पष्ट असल्याचे निरीक्षण नोंदवत दिल्लीतील न्यायालयानं पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला मंगळवारी जामीन मंजूर केला. जामीन मंजुर होताच तापसीनं आनंद व्यक्त केला. (Toolkit Case) “या प्रकरणी आशा अद्याप जिवंत आहे.” अशा आशयाचं ट्विट तिनं केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
अवश्य पाहा - सारा अली खान आणि विजय देवरकोंडा बॉलिवूडमधलं नवं जोडपं? पुन्हा दिसले एकत्र दिशा रवी हिला एक लाख रुपयांच्या जामिनावर मुक्त करताना अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेदर राणा यांनी या प्रकरणाच्या तपासाबाबत परखड निरीक्षणे नोंदवली. ‘‘दिशा रवी हिची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची नाही. त्यामुळे जामीन देण्याचा नियम मोडण्याचे कोणतेही कारण यात दिसत नाही’’, असे नमूद करत न्यायालयाने तिला जामीन मंजूर केला.