जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Do You Love Me म्हणतं दिशा पाटनीनं केलं चाहत्यांना घायाळ, ‘बागी 3'चं नवं गाणं रिलीज

Do You Love Me म्हणतं दिशा पाटनीनं केलं चाहत्यांना घायाळ, ‘बागी 3'चं नवं गाणं रिलीज

Do You Love Me म्हणतं दिशा पाटनीनं केलं चाहत्यांना घायाळ, ‘बागी 3'चं नवं गाणं रिलीज

बागी3 चं नवं गाण रिलीझ झालं आहे. डू यू लव मी या गाण्यात दिशा पाटनी बोल्ड अंदाजात पाहा मिळते आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,27 फेब्रुवारी: ‘बागी3’ चं नव गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. चित्रपटातील ‘दस बहाने 2.0’ आणि भंकस यासारख्या गाण्यानंतर आणखी एक नव गाणं रिलीज झालं आहे. ‘बागी3’ हा चित्रपट येत्या 6 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचं आणखी एक गाण प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डू यू लव मी’ या गाण्यामध्ये दिशा पाटनी तिच्या हॉट अंदाजात पाहायला मिळते आहे. दिशानं या गाण्यात आपल्या बोल्ड लूकने प्रेक्षकांना घायाळ केल आहे. तिच्या या लूकची सर्वत्र चर्चा आहे. चाहत्यांनी तिच्या या बोल्ड अंदाजाचं कौतूक केलं आहे. या आधी कधी अशा प्रकारे नृत्यशैली आजमावली नसल्याचं दिशानं सांगितलं आहे. या गाण्यातील हुक लाइन वगळता हे संपूर्ण गाणं हिंदीमध्ये आहे.

‘डू यू लव मी’ या गाण्यात दिशासोबत टाइगर श्रॉफ देखिल पाहला मिळतो आहे. मात्र या संपूर्ण गाण्यात दिशा पाटनीवर फोकस करण्यात आल आहे. दिशा पाटनीच्या या गाण्यातील लूकला चाहत्यांनी पसंती दिली आहे. ‘बागी3’ मध्ये टाइगर सोबतचं श्रध्दा कपूर आणि रितेश देशमुख या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपट प्रेक्षकांसाठी डब्बल धम्माका असणार आहे. इतर बातम्या:  टायटल साँग कानावर पडताच चिमुकल्यानी काय केलं बघा, Video पाहून अभिमान वाटेल वासुदेव आला हो…! शंकर महादेवन यांनाही आवरला नाही Video शेअर करण्याचा मोह

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात