मुंबई, 19 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजासाठी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत ती नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. त्याचसोबत दिशा तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. वर्कआउट करतानाचे किंवा तिच्या ट्रेनिंगचे विविध व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता तिचा नवा लुक पाहून चाहते आश्चर्यचकीत झाले आहेत. दिशाच्या लुकचे **(Disha Patani New Look)**जवळचा मित्र टायगर श्राफ (Tiger Shroff) आणि त्याची आई आयशा श्राफ करत असतात. तिचा नवा लुक काहीसा हटकर आहे. यावरून तिनं प्लास्टिक सर्जरी केल्याची चर्चा रंगली आहे. दिशा पटानीचा नवा लुक चर्चेत दिशा पटानीने तिच्या इन्स्टा स्टोरीला एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा लुक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. तिचे या लुकमधील मोठे ओठ पाहून चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे. यामध्ये तिचे ओठ प्रमाणापेक्षा मोठे दिसत आहेत. दिशाचा हा खरा चेहरा नाही. कारण या व्हिडिओच्या कोपऱ्यात लिहिलेल्या मेसेजवरून याची माहिती मिळते. फिल्टर वापरून दिशाने हा लुक केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दिशाने प्लास्टिक सर्जरी केल्यासारखे वाटत आहे. दिशाने इन्स्टा फिल्टर वापरले आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या चेहऱ्याचे वाईट चेहऱ्यात रूपांतर होते. नेहमी परफेक्ट लुकमध्ये दिसणाऱ्या दिशाचा हा लोक पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
दिशा पटानी आणि टायगर या जोडीचा वेगळा चाहता वर्ग आहे. फिटनेस ही गोष्ट या दोघांच्यात एक गोष्ट कॉमन आहे. फिटनेसच्या बाबतीत दिशा पटानी आणि टायगर नेहमी जागरूक असतात. टायगरची आई आयशा श्रॉफ आणि बहीण कृष्णा श्रॉफसोबत दिशाचे खास बॉन्डिंग आहे. या दोघी दिशाच्या प्रत्येक फोटोच आणि व्हिडिओचे कौतुक करताना दिसतात. वाचा- ‘अन् या क्षणाला मी भावुक..’, ऐतिहासिक भूमिकेनंतर अपूर्वाची पोस्ट चर्चेत कामाबद्दल सांगायचे तर दिशा पटानीचा आगामी सिनेमा ‘एक विलेन’चा दुसरा भाग 2022 रिलीज होणार आहे.. मोहित सूरीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. 2021 मध्ये सलमान खानच्या ‘राधे’ सिनेमात जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला होता.