मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रभास-दीपिकाला अ‍ॅक्शन स्टंट शिकवण्यासाठी थेट हॉलिवूडमधून येणार दिग्दर्शक;प्रोजेक्ट K करणार धमाका

प्रभास-दीपिकाला अ‍ॅक्शन स्टंट शिकवण्यासाठी थेट हॉलिवूडमधून येणार दिग्दर्शक;प्रोजेक्ट K करणार धमाका

 सध्या अनेक बॉलिवूड-साऊथ सुपरस्टार एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसून येत आहेत. लवकरच बॉलिवूडची मस्तानी आणि साऊथचा बाहुबली अर्थातच दीपिका पादुकोण आणि प्रभास एकत्र झळकणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 सप्टेंबर-  सध्या अनेक बॉलिवूड-साऊथ सुपरस्टार एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसून येत आहेत. लवकरच बॉलिवूडची मस्तानी आणि साऊथचा बाहुबली अर्थातच दीपिका पादुकोण आणि प्रभास एकत्र झळकणार आहेत. प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन स्टारर चित्रपट 'प्रोजेक्ट K'ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली जात आहे. सायन्स फिक्शन जॉनरचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करु शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मितीत निर्माते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत.या चित्रपटाच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने काम केलं जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनसाठी हॉलिवूडमधून अ‍ॅक्शन दिग्दर्शकांना बोलावण्यात आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅक्शन या चित्रपटाचा मुख्य भाग आहे. त्यामुळे अ‍ॅक्शन सीन अगदीउत्तम रित्या व्हावेत निर्मात्यांची इच्छा आहे. यामध्ये त्यांना कोणताही हलगर्जीपणा चालणार नाहीय. त्यामुळे चित्रपटाच्या प्रत्येक सीनवर जवळपास 5 अ‍ॅक्शन युनिट काम करत असल्याचंही सांगण्यात येत आहे.त्यामुळे हा चित्रपट एक मोठं सरप्राईज पॅकेज असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, 'प्रोजेक्ट K' हा एक मोठा चित्रपट ठरु शकतो. हे लक्षात घेऊन मेकर्सही जोरदार तयारी करत आहेत. या चित्रपटात प्रभास, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चन यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाची कथा भविष्यावर आधारित आहे. तसेच, हा चित्रपट महायुद्धावर आधारित असणार आहे. त्यामुळे निर्माते अगदी काळजीने-आभासपूर्वक प्रत्येक गोष्ट तपासून पाहात आहेत.

(हे वाचा:Honey Singh: यो यो हनी सिंह करणार जोरदार कमबॅक; पण परत मिळेल का तोच स्टारडम? )

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट हॉलिवूड स्टाइलमध्ये शूट केला जात आहे. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सीन्स निळ्या आणि हिरव्या पडद्यावर चित्रित करण्यात येणार आहेत. चित्रपटाचं शूटिंग रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरु आहे. चित्रपटाचा एक मोठा भाग जवळपास शूट झाला आहे. उर्वरित कामही जोरात सुरु आहे. प्रभासला शूटिंगसाठी 200 दिवस देण्यात आले होते. या चित्रपटाचे जवळपास 90 टक्के शूटिंग रामोजी फिल्मसिटीमध्ये होणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Bollywood, Deepika padukone, Entertainment, Prabhas