नवी दिल्ली, 13 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या जीवनावर अधारित ‘इंडिया इन माय वेन्स’ (India In My Veins) नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष मलिक (बॉबी) (Subhas Malik) असणार आहेत. सुभाष मलिक यांनी यापूर्वी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. विशेष म्हणजे ते अयोध्येच्या रामलीलाचे अध्यक्ष आहेत. तर गेल्या 27 वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांनी नुकतीच नरेंद्र मोदी याच्या जीवनावर (New Movie On Pm Modi life) अधारित चित्रपट काढण्याची घोषणा केली आहे.
सुभाष यांनी चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, हा चित्रपट नरेंद्र मोदींच्या 2014 सालापासून पुढील आयुष्यावर अधारित असेल. या चित्रपटात पंतप्रधान मोदी यांनी केलेली विकासकामं दाखवली जातील. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटावर काम सुरू होतं. पण 29 मार्च 2021 चा मुहर्त लागला आहे. या चित्रपटात कॅप्टन राज माथूर (Captain Raj Mathur) नरेंद्र मोदींची मुख्य भूमिका साकारताना दिसतील.
महाभारतात द्रोणाचार्यांची भूमिका साकारलेल्या सुरेंद्र पाल (Surendra Pal) यांचीही या चित्रपटात विशेष भूमिका असणार आहे. तर रझा मुराद (Raza Murad) एका काश्मिरीची भूमिका साकारताना दिसणार आहेत. याशिवाय या चित्रपटात अभिनेता बिंदू दारा सिंह (Bindu Dara Singh) एका सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे. तर शाहबाज खान (Shahbaz Khan) देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच इतर अनेक बडे कलाकारही या चित्रपटाचा भाग असणार आहेत.
हे ही वाचा- ‘एक और नरेन’... महाभारतातील 'हा' अभिनेता साकारणार नरेंद्र मोदी
या चित्रपटाचं बहुतांशी चित्रीकरण अयोध्येत केलं जाणार आहे. याशिवाय यूपी, हरियाणा, पंजाबमध्येही या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. हा चित्रपट पुढील सहा महिन्यांच्या आत चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे असोसिएट्स निर्माते शुभम मलिक आहेत. या चित्रपटाचं नाव - 'इंडिया इन माय वेन्स' असं आहे, ज्याचा अर्थ 'माझ्या नसा नसांत भारत' असा होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Personal life, PM narendra modi, Professional, Upcoming movie