मुंबई, 8 नोव्हेंबर: बॉलीवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी (Director Rohit Shetty ) नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत असतोच. काल त्याचा ‘सूर्यवंशी’ (suryavanshi) चित्रपट प्रदर्शित झाला आणि जवळपास दोन वर्षानंतर बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका पाहायाला मिळाला. एकिकडे ‘सूर्यवंशी’ चित्रपटाचे कौतुक होत असतानाच दुसरीकडे दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत. आपल्या मित्राला दिलेले वचन पाळण्यासाठी तो थेट उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar)दाखल झाला आहे. आशिष चंचलानी (ashish chanchlani) हा युट्युब स्टार उल्हासनगर मध्ये राहतो. आशिष चंचलानीला दिग्दर्शक रोहित शेट्टी याने तुला भेटण्यासाठी मी उल्हासनगरमध्ये नक्की येईल असे वचन काही दिवसांपूर्वी दिले होते. मित्राला दिलेले हे वचन काल त्याने पूर्ण केले. अचानक आलेल्या रोहित शेट्टीला पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या भेटीचा व्हिडीओ चंचलानीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
रोहित शेट्टी मित्राला भेटून थेट सेंट्रल पोलीस ठाण्यात दाखल झाला. यावेळी सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी रोहितचं गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं. तसेच पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही रोहितचं स्वागत केलं. यावेळी रोहित शेट्टीची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्याचा सोबत सेल्फी घेणाऱ्यांची गर्दी झाली होती. रोहित देखील दिलखुलासपणे आपल्या फॅन्ससोबत सेल्फी काढताना दिसून आला.