23 मार्च रोजी कंगनाचा वाढदिवस होता. याच पार्श्वभूमीवर 'थलाइवी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरनंतर कंगनाच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी तिच्या अभिनयाचं कौतुकं केलं आहे. यामध्ये राम गोपाल वर्मांनीही तिचं कौतुक केल्यानं संबंधित ट्वीट चांगलचं व्हायरल होतं आहे. याला कंगनानेही शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राम गोपाल वर्मा यांनी ट्वीट करताना म्हटलं की, ' हे! कंगना... मी तुझ्या काही मतांबद्दल आणि अतिशयोक्तिवर असहमत असू शकतो. पण तुझ्या सुपर डुपर थलाइवी चित्रपटासाठी तुला मी सलाम करतो. चित्रपटाचा ट्रेलर अप्रतिम आहे. जयललिता देखील स्वर्गात बसून आनंदित होत असतील.'
Hey sir... I don’t disagree with you on anything... I like and appreciate you very much, in this dead serious world where egos and prides get hurt so easily I appreciate you cause you don’t take anything seriously not even yourself.... Thank you for compliments. https://t.co/bF8XpI83yG
— Kangana Ranaut (@KanganaTeam) March 24, 2021
यावर कंगनानेही दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या खिलाडू वृत्तीचं कौतुक केलं आहे. तिने संबंधित ट्वीटला क्वोट करताना लिहिलं की, 'हॅलो सर! मी तुमच्याशी सहमत आहे. तुम्ही मला खूप आवडता आणि मी नेहमीच तुमची प्रशंसा करते. अहंकारांनी भरलेल्या या जगात जिथं लोकं इगो आणि गर्वासाठी लगेच दुखावले जातात. असं असताना तुम्ही काही गांभीर्यानं घेत नाहीत, अगदी स्वत:लाही. मी तुमच्या या गुणाचं कौतुक करते. चित्रपटासाठी माझं कौतुक केल्याबद्दल धन्यवाद!'
हे ही वाचा - ‘कंगना जयललितांच्या भूमिकेत, मस्करी करताय का?’; राम गोपाल वर्मांचा टोला
कंगनाने दिलेली ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतं आहे. कंगनाचा थलाइवी हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनवर अधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांचा 'एक प्रसिद्ध अभिनेत्रीपासून ते एका यशस्वी राजकारणीपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. हा चित्रपट 23 मार्च रोजी देशातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Kangana ranaut, Ram gopal varma, Social media viral, Twitter, War