जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / महाराष्ट्राची स्वातंत्र्य गाथा मोठ्या पडद्यावर; राज ठाकरेंच्या सभेत सिनेमाचा टीझर रिलीज

महाराष्ट्राची स्वातंत्र्य गाथा मोठ्या पडद्यावर; राज ठाकरेंच्या सभेत सिनेमाचा टीझर रिलीज

महाराष्ट्राची स्वातंत्र्य गाथा मोठ्या पडद्यावर; राज ठाकरेंच्या सभेत सिनेमाचा टीझर रिलीज

दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर साबळे ( shahir sable ) यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ ( maharashtra shahir teaser release ) सिनेमा घेऊन येत आहेत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 1 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांची आज औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेला दिग्दर्शक केदार शिंदे**(Kedar Shinde)** व अभिनेता अंकुश चौधरी देखील उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमागं खास कारण होतं. दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर साबळे ( shahir sable ) यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’  ( maharashtra shahir  teaser release ) सिनेमा घेऊन येत आहेत. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला. शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना अभिवादन म्हणून त्यांच्या जीवनकार्याचा वेध ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं असून पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. शिवाय अजय- अतुल या जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी**(Ankush Chaudhari)** दिसणार आहे. वाचा- ‘स्वातंत्र्यावर घाला आल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रातील..?अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत शाहीर साबळे या अलौकिक व्यक्तिमत्त्वावर जीवनपट साकारला जाणार आहे. केदार शिंदे या चित्रपटावर गेली अडीच वर्षं काम करत आहेत. ‘जय जय महाराष्ट्र माझा’, ‘जेजुरीच्या खंडेराया’, ‘या गो दांड्यावरून’ ही शाहिरांची अजरामर गाणी चित्रपटात असणार आहेत.

जाहिरात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांनी लेखक जेम्स लेनच्या मुद्द्यावरुन शरद पवारांना अनेक प्रश्न विचारले. “तुमची केंद्रात सत्ता होती तेव्हा जेम्स लेनला का नाही आणलंत? महाराष्ट्राची का डोकी फिरवलीत? कशासाठी हे विष पाजलत? शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते की नव्हते असा वाद उकरुन काढायचे. रामदास स्वामींकडे तुम्ही जातीय पाहणार? रामदास स्वामी कधी बोलले की मी शिवाजी महाराज शिष्य होते? किंवा शिवाजी महाराज रामदास स्वामी गुरु होते असे बोलले का? रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलंय त्यापेक्षा उत्कृष्ठ आजपर्यंत मी कुठेच वाचलेलं नाही”, असं राज ठाकरे जाहीर सभेत म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात