मुंबई, 21 जुलै : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput)निधनानंतर त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut)ने नेपोटिझम या विषयाला हात घातला. आणि सोशल मीडियावर आता मोठा वादंग निर्माण झाला आहे. इनसायडर-आउटसायडर या विषयावरून सोशल मीडियावर वाद रंगू लागले आहेत. त्यातच कंगनाने एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटले होते की, तिने केलेले दावे जर ती सिद्ध करू शकली नाही तर ती मानाचा पद्मश्री सन्मान परत करेल. दरम्यान या एकंदरित प्रकाराबाबत दिग्दर्शक अनुराग कश्यपने (Anurag Kashyap) मौन सोडले आहे. त्याने ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे आणि कंगनाची कानउघडणी केली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘मी या नवीन कंगनाला ओळखत नाही’. त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘जर तिच्या परिवारातील सदस्य किंवा मित्रपरिवार हे नाही पाहू शकत की ती काय करतेय, तर खरंतर सध्या तिचं कुणीच असं जवळचं राहिलं नाही आहे’.
कल कंगना का interview देखा। एक समय में मेरी बहुत अच्छी दोस्त हुआ करती थी। मेरी हर फ़िल्म पे आके मेरा हौसला भी बढ़ाती थी। लेकिन इस नयी कंगना को मैं नहीं जानता। और अभी उसका यह डरावना इंटर्व्यू भी देखा जो मणिकर्णिका की रिलीज़ के बिलकुल बाद का है https://t.co/sl55GsO9v5
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 20, 2020
दिग्दर्शक अनुराग कश्यपने कंगनाबाबत बोलताना आणखी काही ट्वीट शेअर केले आहेत. त्याने कंगनाचा मणिकर्णिका सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरची मुलाखत देखील शेअर केली आहे. या मुलाखतीसाठी त्याने ‘डरावना’ अर्थात भीतीदायक असा शब्द वापरला आहे. त्याचबरोबर तो असं म्हणाला की, ‘माझ्याकडून शिका, माझ्यासारखं बना .. असे शब्द 2015 आधी मी कंगनाच्या तोंडून कधीच ऐकले नव्हते.’
Success और ताक़त का नशा हर किसीको बराबर बहकाता है , चाहे वो insider हो या outsider। “मुझसे सीखिए , मेरे जैसा बनिए”, यह बात मैंने २०१५ से पहले उसके मुँह से कभी नहीं सुनी। और तब से अब तक बात यहाँ आ पहुँची है कि जो मेरे साथ नहीं है वो सब मतलबी और चापलूस हैं।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 20, 2020
अनुराग कश्यपने कंगनावर असा आरोप देखील केला आहे की, ‘कंगना तिच्या दिग्दर्शकांना शिव्या देते, ए़डिटमध्ये बसून तिच्या सहकलाकारांचे रोल कापते. जे दिग्दर्शक आधी तिची प्रशंसा करायचे ते आता तिच्याबरोबर काम करण्यापासून दूर पळतात. ही दुसऱ्यांना दाबून टाकण्याची ताकद तिने कमावली आहे,असे तिला वाटते’.
अनुराग कश्यप पुढे म्हणाला आहे की, आता ही कंगना मला सहन नाही होत आहे.
अपने सभी निर्देशकों को जो गाली देती है , जो एडिट में बैठ कर , सभी सह कलाकारों के रोल काटती है । जिसके साथ उसके कोई भी पुराने निर्देशक जो सभी कंगना को सराहते थे , उसके साथ काम करने से दूर भागते हैं । यह ताक़त जो कंगना को लगता है उसने कमायी है, दूसरों को दबाने की ..
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 20, 2020
मैं बोलूँगा @KanganaTeam ।बहुत हो गया। और अगर यह तुम्हारे घर वालों को भी नहीं दिखता और तुम्हारे दोस्तों को भी नहीं दिखता तो फिर एक ही सच है की हर कोई तुम्हारा इस्तेमाल कर रहा है और तुम्हारा अपना आज कोई नहीं है । बाक़ी तुम्हारी मर्ज़ी, मुझे जो गाली बकनी है बको ।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) July 20, 2020
दरम्यान दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या या ट्वीट सीरिजनंतर त्याला देखील ट्रोलिंगची शिकार व्हावे लागले आहे. कंगनाची बाजू पटणाऱ्या अनेक चाहत्यांनी त्याला उलट प्रश्न विचारले आहेत.

)







