२०२१ वर्ष सुरू होऊन सहा महिनेच उलटले आहेत. पण याच वर्षी काही सेलिब्रिटींनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यात दिग्गज अभिनेते दिलीप कुमारांसह राज कौशल ते बिक्रमजीत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. पाहा कोण आहेत.
७ जुलै २०२१ ला दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. ते ९८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील एका पर्वाचा अंत झाला आहे.
हॉरर चित्रपटांचे दिग्दर्शक कुमार रामसे (Kumar Ramsay) यांचं 8 जुलैला हार्ट अटॅकने निधन झालं. त्यामुळे पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती.
फिल्म प्रोड्यूसर आणि अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल याचं 30 जूनला निधन झालं होतं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच अचानक निधन झालं.
4 जूनला रिंकू सिंग निकुंभचं कोरोनाने निधन झालं. तिने आयुषमान खुरानाच्या ड्रिम गर्ल चित्रपटात काम केलं होतं. ती अवघी ३५ वर्षांची होती.
अभिनेत्री अभिलाषा पाटील यांच ४ मे २०२१ ला कोरोनाने निधन झालं. फिल्म ‘छिछोरे’ ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘गुड न्यूज’ या चित्रपटांत त्यांनी काम केलं होतं. याशिवाय मराठी चित्रपटातही काम केलं होतं. त्या ४७ वर्षांच्या होत्या.
23 एप्रिल 2021 ला प्रसिद्ध संगीतकार श्रवण राठौड याचं कोरोनाने निधन झालं. बॉलिवडमध्ये त्यांनी अनेक हिट गाणी दिली होती.