जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील Photo व्हायरल; सायरा बानो यांनी दिली मोठी अपडेट

दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील Photo व्हायरल; सायरा बानो यांनी दिली मोठी अपडेट

दिलीप कुमार यांचा रुग्णालयातील Photo व्हायरल; सायरा बानो यांनी दिली मोठी अपडेट

‘तुमच्या प्रार्थनेमुळं दिलीप कुमार बरे झाले’; सायरा बानो यांनी मानले चाहत्यांचे आभार

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 7 जून**:** बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Veteran actor Dilip Kumar) यांच्या प्रकृती संदर्भातली एक मोठी अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, त्यांना ऑक्सिजन (oxygen support)सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. 6 जून रोजी त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरु होते. आता त्यांना व्हेंटिलेटरवर (Ventilator) नाही तर ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. दरम्यान दिलीप कुमार यांनी रुग्णालयातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोद्वारे त्यांनी आपण तंदुरुस्त आहोत अन् लवकरच घरी परत येऊ असं आश्वासन चाहत्यांना दिलं आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

जाहिरात

सारा अली खाननं रियाला ऑफर केला होता गांजा; NCB चौकशीत मोठा खुलासा दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी देखील एक पोस्ट शेअर करुन सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून दिलीप साहेब आजारी होते. त्यांना बरं वाटत नव्हतं. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार करत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेमुळंच दिलीप साहेब पुन्हा एकदा ठणठणीत बरे होऊन घरी परतणार आहेत. सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या.” अशा आशयाची पोस्ट लिहून सायरा बानो यांनी चाहत्यांचे आभार मानले. ‘लढणं थांबवता येत नाही’; वडिलांच्या निधनानंतरही अभिनेत्री करतेय शेतात काम

पीडी हिंदुजा हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजिस्ट डॉ. डॉक्टर जलील पारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या फुफ्फुसा संदर्भातल्या काही चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे रिपोर्ट येणं अद्याप बाकी आहे. मात्र ते खुप वेगानं बरे होत आहेत. आणि लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल. तुम्ही दिलीप कुमार यांची काळजी करु नका आम्ही त्यांच्यासोबत आहोत तुम्ही सर्वांनी स्व:ची काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांनी चाहत्यांना दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात