नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला (Hrithik Roshan) ग्रीक गॉडची उपमा दिली जाते. जगातील टॉप टेन हँडसम पुरुषांमध्ये (Handsome Male) त्याची गणना होते. पत्नी सुझान खानसोबत (Sussanne Khan) घटस्फोट घेतल्यापासून हृतिकचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं आहे. हृतिक आणि सुझाननं 2014 मध्ये घटस्फोट घेतला होता. वेगळं होऊनही दोघे मिळून आपल्या मुलांचं संगोपन करतात. गेल्या काही दिवसांपासून हृतिक पुन्हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी हृतिक रोशन आणि सबा आझाद (Saba Azad) एकत्र स्पॉट झाल्यापासून, प्रत्येकजण त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या शुक्रवारी (28 जानेवारी 2022) संध्याकाळी सबा आझाद हृतिकसोबत एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली होती. त्यावेळी तिनं तोंडाला मास्क लावलेला होता. त्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये हृतिकनं सबाचा हात धरलेला दिसत होता. हृतिक आणि सबाची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे (Common Friend) झाल्याची माहिती समोर आली आहे. 32 वर्षीय सबा आझाद ही एक अभिनेत्री (Actor), संगीतकार (Musician) तसेच गीतकार (Lyricist) आहे.
कामानिमित्त झाली होती हृतिक आणि सबाची भेट
इंडिया टुडेनं दिलेल्या बातमीनुसार, हृतिक आणि सबाची भेट इंडी म्युझिकशी (Indie music) संबंधित असलेल्या एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली होती. पहिल्या भेटीपासून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर ते एका डिनर डेटवर (Dinner Date) भेटले. जिथं त्यांनी आपापल्या कामाबाबत चर्चा केल्याचं म्हटलं जात आहे.
सबानं अभिनय क्षेत्रातही केलं आहे काम
सबा आझादनं 2008 मध्ये 'दिल कबड्डी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिनं 2011मध्ये साकिब सलीमसोबत (Saqib Saleem) 'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'फील्स लाइक इश्क'मध्येही तिनं अभिनय केलेला आहे.
म्युझिक बँडमध्येही काम करते सबा
नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्या म्युझिक बँडमध्ये सबा काम करते. येत्या काळात ती 'रॉकेट बॉईज' या चित्रपटामध्ये जीम सरभ आणि इक्वाक सिंगसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तर, हृतिक रोशन 'फायटर' या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. हृतिक आणि दीपिका पहिल्यांदाच एका प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत. याशिवाय तो सैफ अली खानसोबत 'विक्रम वेदा'च्या रिमेकमध्येही काम करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment, Hritik Roshan, Relationship, Rock music