नेटकरी म्हणतात ही तर दिशाची हमशकल या सर्व गदारोळात अनेक चतुर नेटकऱ्यांना ही महिला बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणीसारखी दिसते असा भास होत आहे. अनेक वायरल प्लॅटफॉर्म्सवरून हा विडिओ शेअर झाला आहे. Giedde नावाच्या पेजवरून हा विडिओ शेअर झाला असून जवळपास 70 हजाराच्या आकड्यात याचे व्युज आणि 9 हजाराच्या घरात लाईक्स आहेत. यावर अनेकांनी टायगर श्रॉफला (Tiger Shroff) सोडून लग्न केल्याबद्दल मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. बॉलिवूड तारेतारकांचं विश्व इतकं रंजक आणि मसालेदार असतं की त्यात सगळ्यांना रस असतो. त्यांच्या कपड्यांपासून, डेटिंग लाईफपर्यंत अनेक बाबीं जाणून घेण्यासाठी लोकं आतुर असतात. अभिनेत्री दिशा पाटणीचं नाव अभिनेता टायगर श्रॉफसोबत कायम जोडलं जातं. ते दोघे रिलेशनशिपमध्ये (Disha Patani Tiger Shroff relationship) असल्याच्या बातम्या समोर येत असतात. यांच्यामध्ये नक्की काय नातं आहे यावर दोघांकडूनही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही पण ते बरेचदा सोबत फिरताना दिसले आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Disha patani