जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबाबत काय म्हणाली Dia Mirza, हैराण करणारं ट्वीट VIRAL

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबाबत काय म्हणाली Dia Mirza, हैराण करणारं ट्वीट VIRAL

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबाबत काय म्हणाली Dia Mirza, हैराण करणारं ट्वीट VIRAL

दिया मिर्झानं ट्वीट (Dia Mirza Tweet) करत पुरुषांच्या प्रायवेट पार्टबद्दल लिहिलं आहे. तिचं हे ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 27 मार्च : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) आपल्या सौंदर्यामुळं सतत चर्चेत असते. दियानं अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. तिच्या अनेक सिनेमांना चाहत्यांची पसंतीही मिळाली. सध्या अभिनेत्री मालदीवमध्ये सुट्टी इन्जॉय करत आहे. याचे फोटो अभिनेत्रीनं नुकतेच शेअरदेखील केले आहेत. अशात आता अभिनेत्रीचं नवं ट्वीट (Dia Mirza Tweet) सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. दियानं या ट्वीटच्या माध्यमातून वाढत्या प्रदुषणामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधलं आहे. इतकंच नाही तर तिनं संशोधनावर आधारित एक अहवालही शेअर केला आहे. अभिनेत्रीचं हेच ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. काय आहे ट्वीट - दियानं केलेल्या ट्वीटमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की पर्य़ावरणातील विषारी रसायनांमुळे शुक्राणूंची संख्या आणि टेस्टिरकल्सवर याचा परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर (Private Part) होत आहे.

जाहिरात

दिया मिर्झानं ट्वीट (Dia Mirza Tweet) करत लिहिलं, की आता लोक पर्यावरणाबद्दल जागरुक होतील. दियाचं हे ट्वीट चांगलंच व्हायरल होताना दिसत आहे. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. दिया पर्यावरणाच्या बाबतीत भरपूर जागरुक आहे आणि याआधीही तिनं याबद्दल अनेक ट्वीट केले आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये दियानं उद्योजक वैभव रेखीसोबत लग्नगाठ बांधली आहे. दियाचं हे दुसरं लग्न आहे. या लग्नात दिया आणि वैभवचे काही खास मित्र आणि कुटुंबीयच सहभागी झाले होते. लग्नानंतर दियानं समुद्र किनाऱ्यावरील आपले काही बोल्ड फोटोही शेअर केले होते. चाहत्यांनाही दियाचा हा अंदाज पसंतीस पडला होता. दियाचा रहना है तेरे दिल में चित्रपट आजही तिच्या चाहत्यांसाठी खास आहे. आहे. या सिनेमात ती आर माधवनसोबत झळकली होती. या सिनेमाला चाहत्यांची पसंती मिळाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात